China promotes bear bile as coronavirus cure kkg
चीनचे प्रयोग थांबेनात! कोरोनाला रोखण्यासाठी आखतोय अजब योजना By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 12:48 PM2020-04-02T12:48:50+5:302020-04-02T13:01:25+5:30Join usJoin usNext जगात सध्या सर्वत्र धुमाकूळ घालणारा कोरोना विषाणू चीनमधून पसरला. त्यामुळे चीन जगभरातून टीका झाली. वटवाघळाच्या माध्यमातून कोरोना माणसाच्या शरीरात पोहोचल्याचं म्हटलं जातं. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात प्राणी, पक्षी खाल्ले जातात. त्यामुळे यावरुनही चीनला लक्ष्य करण्यात आलं. कोरोनामुळे टीकेचा धनी ठरलेल्या चीननं आता त्याच कोरोनाच्या औषधावर काम सुरू केलं आहे. जंगली जीव जंतूंपासून तयार करण्यात आलेल्या औषधांचा वापर करण्याचे आदेश चीन सरकारनं डॉक्टरांना दिले आहेत. यातील एका औषधात अस्वलाच्या पित्ताशयातल्या एका तरल पदार्थाचा समावेश आहे. याशिवाय बकरीची शिंगं आणि तीन प्रकारच्या रोपांचाही समावेश आहे. प्राण्यांच्या रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्था, संघटनांनी चीनच्या सरकारच्या या आदेशावर टीकेची झोड उठवली आहे. गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांना अस्वलाच्या पित्ताशयातल्या पदार्थाचा समावेश असलेलं औषध देण्यात यावं, अशी शिफारस चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं दिले आहेत. चीन आणि व्हिएतनाममध्ये जवळपास १२ हजार अस्वलांना पिंजऱ्यात ठेवण्यात आलं आहे. जिवंत प्राण्यांना खाण्याची आणि त्यांच्यापासून औषधं तयार करण्याचं काम चीनमधून हजारो वर्षांपासून सुरू आहे. प्राण्यांच्या शरीराच्या अवयवांमध्ये उपचार करण्याची क्षमता असते. त्यामुळेच चीनच्या अनेक भागांमध्ये प्राण्यांच्या अवयवांचा वापर केला जातो. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याचीनcorona viruschina