china says to retaliate after America demands closure of huston embassy
युद्धाचे ढग! अमेरिकेनं दिला दूतावास बंद करण्याचा आदेश; चीनची पलटवार करण्याची धमकी By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 08:18 PM2020-07-22T20:18:53+5:302020-07-22T20:37:37+5:30Join usJoin usNext अमेरिकेने ह्युस्टन येथील चिनी दूतावास बंद करण्याचा आदेश दिल्यानंतर, आता चीननेही पलटवार करण्याची धमकी दिली आहे. ह्यूस्टनमधील चिनी दूतावास बंद करण्याचा निर्णय अमेरिकन नागरिकांची बौद्धिक संपदा आणि खासगी माहिती सुरक्षित राहावी यासाठी घेण्यात आला असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्या वांग वेनबिन म्हणाले, अमेरिकेने मंगळवारी दूतावास बंद करावा, असे म्हटले आहे. अमेरिकेचे हे पाऊल संबंध अधिक खराब करणारे आहे. एवढेच नाही, तर अमेरिकेतील चिनी दूतावास आणि राजदूतांना धमक्याचे फोनही येत आहेत. अमेरिकेने आपला हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी चीन करत आहे. मात्र, अमेरिका त्यांच्या निर्णयावर ठाम राहिला तर, चीनही प्रत्युत्तरात कार्रवाई करेल. चीनची अमेरिकन राजदूतांविषयी नेहमीच चांगली भावना राहिली आहे आणि अमेरिकेत आमच्या राजदूतांनीही अमेरिका-चीन संबंध मजबूत केले आहेत. या उलट, जून महिन्यात अमेरिकेने चिनी राजदूतांवर अनेक प्रकारची बंधने टाकली, असे वांग वेनबिन म्हणाले. अमेरिकेने चिनी राजदूतांचे मेल आणि आधिकृत मेसेजही जप्त केले होते. तसेच, अमेरिकेकडून जाणून-बुजून अमेरिकेत राहणाऱ्या चिनी राजदूतांना जिवे मारण्याच्या धमक्यादेखील मिळत आहेत, असेही वांग यांनी म्हटले आहे. वांग म्हणाले, चिनीमधील अमेरिकन दूतावासाने चीनवर हल्ला करत अनेक लेख लिहिले आहेत. त्यामुळे कोण कुणाच्या अंतर्गत राजकारणात दखल देत आहे आणि वाद उत्पन्न करत आहे, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. ते म्हणाले, अमेरिकेचा दावा आहे, की चीन-अमेरिका संबंधांत असंतुलन आहे. खरे तर, राजदूत आणि डिप्लोमॅटिक इंस्टिट्यूट्सच्या संख्यांचा विचार केला तर चीनच्या तुलनेत त्यांचीच संख्या अधिक आहे. मात्र, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोर्गन ओर्तागूस म्हणाले, अमेरिकन नागरिकांची बौद्धिक संपदा आणि खासगी माहितीच्या सुरक्षिततेसाठी ह्यूस्टन दूतावास बंद केला जावा, असे चीनला सांगण्यात आले आहे. मोर्गन ओर्तागुस म्हणाले, अमेरिकन नागरिकांच्या सार्वभौमत्वाचे आणि गोपनीयतेचे चीनने उल्लंघन करणे, सहन केले जाणार नाही. जसे, आम्ही चीनसोबत व्यापारात चुकीच्या कोष्टी सहन केल्या नाही. ग्लोबल टाइम्सचे संपादक हु शिजिन यांनी ट्विटर करून सांगितले, की अमेरिकेने चीनला दूतावास बंद करण्यासाठी 72 तासांची मुदत दिली आहे. यानंतर वांग यांची प्रतिक्रिया आली आहे. हु म्हणाले, हा मूर्खपणा आहे. ह्यूस्टनमधील दूतावास हा अमेरिकेतील चीनचा पहिला दूतावास होता. अमेरिकेने तो केवळ बंद करायलाच सांगितले नाही, तर खाली करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे. हे अत्यंत मूर्खपणाचे आहे. अमेरिकेतील काही लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. सध्येचे ट्रम्प सरकार काहीही करायला तयार आहे, असेही हु यांनी म्हटले आहे. अमेरिकन माध्यमांत बुधवारी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, चिनी दूतावासाच्या परिसरात दस्तऐवज जाळले जात असल्याच्या वृत्तावर, ह्यूस्टन पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ह्यूस्टन पोलिसांनी म्हटेल आहे, की त्यांना रात्री 8 वाजता, मॉन्ट्रोज बोलेवार्ड (जेथे चिनी दूतावास आहे) येथे दस्तऐवज जाळले जात आहेत, अशी माहिती मिळाली. ह्यूस्टन येथे चिनी दूतावासाच्या आधिकृत वेबसाइटनुसार, 1979 मध्ये दोन्ही देशांत डिप्लोमॅटिक संबंध प्रस्थापित झाले. तेव्हा ह्यूस्टन येथे पहिल्या चिनी दूतावासाची निर्मिती करण्यात आली होती. दक्षिण अमेरिकेतील 8 राज्य याच्या कक्षेत येतात. चीन आणि अमेरिका सध्या अनेक मुद्द्यांवर आमने-सामने उभे आहेत. मग तो, कोरोना व्हायरसचा मुद्दा असो वा हाँकाँग आणि शिनजियांगमधील मानवाधिकाराचा, अशा अनेक मुद्द्यांवर चीन आणि अमेरिका एकमेकांविरोधात उभे राहत आहेत. गेल्या काही महिन्यांत चीनने अमेरिकन माध्यमांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बऱ्याच पत्रकारांना काढले आहे. तर अमेरिकेनेही आपल्याकडे काम करणाऱ्या चिनी पत्रकारांवर व्हीसाचे निर्बंध घातले आहेत. अमेरिकेने डिसेंबर महिन्या दोन चिनी राजदूतांना हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली बर्खास्त केले होते. मात्र, चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ता गेंग शुआंग यांनी अमेरिकेचा हा दावा फेटाळला होता. शी जिनपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प.टॅग्स :चीनअमेरिकाकोरोना वायरस बातम्याडोनाल्ड ट्रम्पchinaAmericacorona virusUSUnited StatesDonald Trump