China Thousands of troops were deployed near the Indian border in a matter of hours
Ladakh Standoff: चीनची पुन्हा कुरघोडी; भारतीय सीमेजवळ काही तासांतच हजारो सैनिकांना केले तैनात By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 11:45 AM2020-06-08T11:45:37+5:302020-06-08T12:45:59+5:30Join usJoin usNext पूर्व लडाखमधील भारत आणि चीन यांच्यातील सीमा वादावर दोन्ही देशांच्या लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पातळीवर बैठक पार पडली. या बैठकीत शांततापूर्ण सीमा वाद सोडवण्यासाठी चीनने तयारी दर्शवली आहे. मात्र चीनची सीमेवर कुरघोडी अजूनही चालूच आहे. भारत आणि चीन यांच्यात सीमेवरुन सुरू असलेल्या संघर्षाच्या दरम्यान चीनेने भारताच्या सीमेजवळ हजारो सैनिक तैनात केले आहे. चीनने हजारो सैनिकांसह अनेक टँक, बख्तबंद गाडी यांना लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (LAC)जवळ तैनात केले आहे. चीनने सैनिकांना बस, ट्रेन आणि विमानातून भारताला लागून असणाऱ्या चीनच्या उत्तर- पश्चिमच्या भागात तैनात केले आहे. चीनने हे सर्व काम काही तासांत केले गेले जेणेकरुन चीन भारताला दर्शवू शकेल की, ते फारच कमी वेळात आपले सैन्य तैनात करु शकते. चीनने हजारो पॅराट्रूपर्स चीनच्या मध्य प्रांत असलेल्या हुबेई येथून भारताच्या सीमेकडे वळवले आहेत. चीन भारताच्या सीमेवर आपल्या सैन्याची ताकद सातत्याने वाढवत आहे. या सैनिकांमध्ये पीएलए एअर फोर्सच्या पॅराट्रूपर्सच्या तुकड्यांचा देखील समावेश आहे. चीनने सुमारे 3000 किमीचा प्रवास काही तासांतच पूर्ण केला. सध्या भारत आणि चीनमध्ये सीमेवरुन वाद सुरु आहे. याआधी सीमेवर अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांना भिडले देखील होते. दरम्यान, द्विपक्षीय करारानूसार सीमाभागातील निर्माण झालेली परिस्थिती शांततेने सोडवण्यास चीन तयार आहे. दोन्ही देशांच्या लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांची बैठक देखील अतिशय शांत वातावरणात झाली असल्याचे परराष्ट्रीय मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. लष्करी व डिप्लोमेटिक लेवलवर चीनशी चर्चा यापुढे देखील सुरूच राहील असं परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. मात्र लडाखमधील सीमेवर दोन्ही देशांतील मोठ्या संख्येने सैन्य जमले आहे. त्यांना परत बोलावण्याबाबत काही निर्णय झाला की नाही हे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलेलं नाही. परंतु सीमावादवरुन भारत आणि चीनधील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दोन्ही देशांकडून सांगण्यात येत आहे.टॅग्स :लडाखचीनभारतभारतीय जवानladakhchinaIndiaIndian Army