लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत भारतावर हवाई हल्ल्याची चीनची तयारी, सॅटेलाइट फोटोंमधून उघड By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 03:33 PM 2020-08-10T15:33:54+5:30 2020-08-10T15:50:08+5:30
. ड्रोन विमानांवर हल्ला करण्यापासून चीनने भारतातल्या हवाई तळांवर अणुबॉम्ब टाकण्यास सक्षम विमाने तैनात केली आहेत. लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला लष्करी तणाव अनेक फे-यांच्या चर्चेनंतरही थांबण्याचं नाव घेत नाहीये.
एकीकडे चीन पँगॉंग सो लेक व देप्सांग येथून माघार घेण्याचे नाव घेत नाही, तर दुसरीकडे ड्रॅगन उत्तर भारताला लागून असलेल्या आपल्या भागातील हवाई दलाला सातत्यानं मजबूत करत आहे.
ड्रोन विमानांवर हल्ला करण्यापासून चीनने भारतातल्या हवाई तळांवर अणुबॉम्ब टाकण्यास सक्षम विमाने तैनात केली आहेत. एवढेच नव्हे तर चीन नवीन एअरबेसही तयार करत आहे.
ओपन सोर्स इंटेलिजन्स अॅलिलिस्ट डेटरेस्फा यांनी जाहीर केलेल्या उपग्रहाच्या चित्रातून हे स्पष्ट झाले आहे की, चीन सतत भारताला लागून असलेल्या 13 एअरबेस अद्ययावत करत आहे.
चीनचे हे विमानतळ लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या भारतीय भागाच्या जवळ आहेत. चीनने लडाखला लागून असलेल्या काशी विमानतळावर जे 11, जेएच 7 आणि ड्रोन विमानं तैनात केली आहेत.
त्याचवेळी चीनने होटान एअरबेसवर जे 11, जे 7, अॅव्हॅक्स आणि ड्रोन विमाने तैनात केली आहेत. चीनचे जे 11 आणि ड्रोन विमानं नागरी तळांवर तैनात केली आहेत.
तशकुर्गान आणि केरिया येथे चीनकडून आणखी दोन विमानतळ वाढवण्याची तयारी याव्यतिरिक्त, चीन तशकुर्गान आणि केरियामध्ये आणखी दोन एयरबेस तयार करीत आहे. त्याच मार्गाने चीन केवळ भारताच्या ईशान्येकडे लागून असलेल्या हद्दीतील विमानतळांची निरंतर प्रगती करीत नाही, तर नवीन विमानतळ तयार करण्यातही गुंतलेला आहे.
चीनने सिक्कीम आणि अरुणाचलच्या सीमेजवळील शिग्त्से विमानतळावर जेएच 7 बॉम्बर विमानं आणि जे 11/10, अवॅक्स आणि ड्रोन विमानांची तैनाती केली आहे. तसेच गोंगर आणि गोलमुड विमानतळांवर लढाऊ विमानं तैनात करण्यात आले आहेत.
चीन कमीत कमी एक नवीन तळ उभारत आहे आणि तीन एअरबेस आधुनिक सुविधांनी सुसज्ज करत आहे. उंचीमुळे या प्रदेशातील हवाई शक्तीच्या बाबतीत चीन भारतापेक्षा दुर्बल आहे हे माहीत आहे.
भारतीय एअरबेस खालच्या भागात असताना जिथून ते त्यांच्या पूर्ण क्षमतेनुसार चीनविरुद्ध कारवाई करू शकतात.
बेलफर सेंटरने मार्चमध्ये प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार, भारताकडे जवळपास 270 लढाऊ विमानं आणि 68 भू-हल्ले लढाऊ विमानं आहेत. त्याचबरोबर भारताने चीनच्या सीमेवर अनेक हवाई पट्ट्या बांधल्या आहेत, जिथून या लढाऊ विमानांना सहजपणे उड्डाण करता येणार आहे.
चीन, पाकिस्तानचा धोकादायक मित्र, भारतासाठी धोका- तज्ज्ञ तज्ञ म्हणतात की, काश्मीर आणि लेहच्या आसपास चीनच्या वाढत्या हवाई हल्ल्याच्या तयारीवरून असे दिसून येते की, ड्रॅगनला उत्तर भारतावर आपले हवाई प्रभुत्व स्थापित करायचे आहे.
त्याचबरोबर हे देखील दर्शविते की, चीन आणि पाकिस्तानच्या हवाई दलात भारताविरुद्ध युती झाली आहे. चीन आता ईशान्य भारतात ड्रोन बेस तयार करत आहे.
याला उत्तर देताना चीनच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी भारताला लष्करी तळ अधिक बळकट करावे लागतील. चीन आपले स्वतःचे जाळे तयार करीत आहे.
चीनचे जे -11 लढाऊ विमान किती शक्तिशाली? शेनयांग जे 11 लढाऊ विमानांची रेंज 3530 किलोमीटर आहे. जे ताशी अधिकतम 2500 किमी वेगाने उड्डाण भरू शकतात. सध्या चीनमध्ये या विमानाच्या 250 हून अधिक युनिट्स आहेत. हे विमान रशियाच्या एसयू 27 एसकेची आवृत्ती आहे.
हे विमान हवाई क्षेत्र आणि ग्राऊंड हल्ल्यापासून संरक्षण करण्यास सक्षम आहे. विमानात 30 मिमीचा कॅनॉन देखील आहे. तर अनेक प्रकारच्या क्षेपणास्त्र त्याच्या 10 हार्ड पॉईंटवर ठेवता येतात.