चीननेच कोरोनाची माहिती लपविली, WHO ही साथीला! आरोप करणाऱ्या महिला सायंटिस्टचे पलायन By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 02:20 PM 2020-07-11T14:20:22+5:30 2020-07-11T14:26:28+5:30
हाँगकाँगच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये व्हायरॉलॉजी आणि इम्युनिटी स्पेशालिस्ट असलेल्या डॉ. ली-मेंग यान हिने चीनवर आरोप लावला आहे की, त्यांना कोरोना या घातकी व्हायरसबाबत माहिती होती आणि त्यांनी ती जगापासून लपविली. चीनवर सुरुवातीपासूनच कोरोना व्हायरसवरून जगभरातून गंभीर आरोप लावण्यात येत आहेत. यावर चीन दावा करत आहे की त्यांनी कोरोनाशी संबंधित कोणतीही माहिती लपविलेली नाही. मात्र, चीनच्या ताब्यात असलेल्या हाँगकाँगच्या एका महिला संशोधकाने खळबळजनक दावा केला आहे.
कोरोना व्हायरसबाबत चीनला खूप आधीपासून माहिती होती. तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेही यावर काहीच केले नसल्याचा आरोप तिने केला आहे.
हाँगकाँगच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये व्हायरॉलॉजी आणि इम्युनिटी स्पेशालिस्ट असलेल्या डॉ. ली-मेंग यान हिने चीनवर आरोप लावला आहे की, त्यांना कोरोना या घातकी व्हायरसबाबत माहिती होती आणि त्यांनी ती जगापासून लपविली.
डॉ. ली-मेंग यान हिने फॉक्स न्युजशी बोलताना सांगितले की, WHO चे सल्लागार प्रोफेसर मलिक पेरिस यांनी यावर कोमतेही पाऊल उचलले नाही. मी महामारीच्या सुरुवातीला यावर संशोधन केले होते. यावेळी माझा अहवाल सुपरवायझरनी पाहिला नाही. तसे झाले नसते तर लाखो प्राण वाचवू शकलो असतो.
ली -मेंग यान या सध्या चीनपासून वाचण्यासाठी पळून गेल्या आहेत. चीन माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत ाहे. यामुळे माझ्या जिवाला धोका आहे. मी कशीबशी हाँगकाँगमधून पळून गेले आहे. ली या जगातील त्या संशोधकांपैकी एक आहेत ज्यांनी कोरोना व्हायरसच्या सुरुवातीलाच त्यावर संशोधन करण्यास सुरुवात केली होती.
यान यांनी सांगितले की, माझ्या जिवाला धोका आहे. मला शोधण्यासाठी सायबर हल्ले केले जात आहेत. चीनमध्ये मी हे बोलले असते तर मला मारून टाकले असते. यामुळे मी आता घरीदेखील परतू शकत नाहीय. अज्ञात स्थळी राहत आहे.
त्यांना विद्यापीठ/WHO च्या लॅबमधील त्यांच्या वरिष्ठांनी डिसेंबर 2019 मध्येच चीनमध्ये सापडलेल्या SARS सारख्या व्हायरसचे अंश अभ्यासासाठी दिले होते. जो पुढे जाऊन कोरोना असल्याचे सिद्ध झाले.
ली मेंग यांना चीनच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनमधील एका संशोधक मित्राने सांगितले होते की, डिसेंबरमध्ये या व्हायरसचे संक्रमन मानसांना होण्याची शक्यता आहे. याच्या बऱ्याचा काळानंतर WHO ने यावर सहमती दर्शविली होती.
जानेवारीमध्ये WHO ने खुलासा केला होता. चिनी प्रशासनानुसार व्हायरसमुळे काही रुग्णांना गंभीर आजार होत आहेत. मात्र, हा व्हायरस सहजसोप्या पद्धतीने लोकांमध्ये पसरत नाहीय. तसेच याबाबत अधिक माहिती नाही. यानंतर या व्हायरसवर चर्चा करणाऱ्या मोठमोठ्या डॉक्टरांनी अचानकच मौन धारण केले होते.
WHO ने हा दावा नुकताच बदलला आहे. वेबसाईटवर बदल करत हा व्हायरच चिनी प्रशासनाने नाही तर WHO च्या संशोधकांमुळे समजल्याचे म्हटले आहे.
6 महिन्यांपूर्वी WHO चे प्रमुख डॉ. टेड्रोस ऐडनम यांनी दावा केला होता की, हा व्हायरस चीनने नजरेत आणून दिला होता.