मोठी घडामोड! तैवान ताब्यात घेण्यासाठी चीनचे मोठे पाऊल; अमेरिकेचे युद्धनौकांना तातडीचे आदेश By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 04:17 PM 2020-05-17T16:17:45+5:30 2020-05-17T16:33:46+5:30
चीनच्या युद्धाभ्यासामुळे तैवान संकटात असून अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका तैनात केल्या आहेत. चीनने गेल्या गुरुवारपासून ३१ जुलैपर्यंत युद्धाभ्यास सुरु केला आहे. याशिवाय जमीन आणि पाण्यामध्ये दोन्ही ठिकाणी सैन्याला उतरविण्याचा अभ्यास केला जाणार आहे. या ७० दिवसांच्या काळात चीन लाईव्ह फायर ड्रील करणार आहे. कोरोनावरून अमेरिका आणि चीनमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. अशातच आता तैवानवर चीन ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत असताना या वादाचे नवे केंद्र बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चीनच्या सैन्याने तैवानवर ताबा मिळविण्यासाठी मोठा युद्धाभ्यास सुरु केला आहे. हा युद्धाभ्यास तब्बल ७० दिवसांचा असून समुद्राचा एक मोठा हिस्सा चीनने बंद करून टाकला आहे.
चीनच्या युद्धाभ्यासामुळे तैवान संकटात असून अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका तैनात केल्या आहेत. चीनने गेल्या गुरुवारपासून ३१ जुलैपर्यंत युद्धाभ्यास सुरु केला आहे.
याशिवाय जमीन आणि पाण्यामध्ये दोन्ही ठिकाणी सैन्याला उतरविण्याचा अभ्यास केला जाणार आहे. या ७० दिवसांच्या काळात चीन लाईव्ह फायर ड्रील करणार आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तैवानवर कब्जा मिळविण्यासाठी चीन हा ७० दिवसांचा युद्धाभ्यास करत आहे. बोहाई समुद्रामध्ये तैवानवर ताबा मिळविण्यासाठी सर्वात चांगली जागा असल्याचे मानले जात आहे.
येथील आणि तैवानच्या खाडीतील समुद्री परिस्थिती सारखीच आहे. यामुळे चीनचे हे पाऊल खूप खतरनाक आहे.
आशिया टाईम्सनुसार चीनी सैन्य बेटांवर कब्जा करणे, तेथे सैन्याच्या चौक्या स्थापन करणे आणि अँटी एअर आणि अँटी मिसाईलचा अभ्यास करणार आहे. यासाठी चीनने बोहाई समुद्रामध्ये २००० किमींचे क्षेत्र बंद केले आहे.
महत्वाचे म्हणजे तैवानच्या राष्ट्रपती त्साई इंग या येत्या २० मे रोजी देशाला संबोधित करणार आहेत. त्या तैवानला स्वतंत्र राष्ट्र घोषित करतील अशी भीती चीनला वाटत आहे.
तैवानच्या राष्ट्रपती त्साई २०१६ मध्ये सत्तेवर आल्या आहेत. त्यांनी चीनच्या वन चायना पॉलिसीचा विरोध केला आहे. यामुळे चीनने लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे. यामुळे चीन अधुनमधून लढाऊ विमाने आणि युद्धनौका तैवानच्या क्षेत्रात पाठवत असतो.
गुरुवारपासून सुरु केलेल्या युद्धाभ्यासामध्ये चीन विनाशकारी युद्धनौका आणि विमाने वापरते की नाही यावर जगाचे लक्ष असणार आहे. धक्कादायक म्हणजे चीनने तैवानच्या समुद्रात युद्ध करण्यासाठी खास युद्धनौका बनविल्या आहेत.
यामुळे तैवाननेही युद्धाभ्यासाची घोषणा केली आहे. जून महिन्यामध्ये तैवानही समुद्रात आणि जमिनीवर युद्धाभ्यास करणार आहे. तैवानने चीनच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दोन्ही बाजुच्या समुद्र किनाऱ्यांवर दोन स्क्वाड्रन तैनात केल्या आहेत.
मात्र, चीनच्या तुलनेत तैवान खूपच छोटा देश असल्याने जगातील सर्वात शक्तिशाली देश आणि चीनच्या कोरोना व्हायरसमुळे दुखावलेला अमेरिका मदतीला धावून गेला आहे.
चीनच्या कुरापती पाहून अमेरिकेने तातडीने तीन मोठ्या विनाशकारी युद्धनौका तैनात केल्या आहेत. तसेच प्रशांत महासागरात काही लढाऊ विमानवाहू युद्धनौका रवाना केल्या आहेत.
चीनला तैवान का हवेय? तैवानच्या खाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर पेट्रोकेमिकल आणि अन्य मिनरलचा मोठा साठा आहे. तैवानवर कब्जा केल्यास या भागात एक मोठा न्युक्लिअर रिएक्टरही निर्माण करण्याची चीनची योजना आहे. आता जागतिक तज्ज्ञांनुसार साऊथ चायना समुद्रात युद्धासारखी परिस्थिती तयार होणार आहे. यामध्ये चीनविरोधात तैवानच्या बाजुने अमेरिकाच नाही तर रशियाही सहभागी होण्याची शक्यता आहे.
चीनच्या मंत्र्याची अमेरिकेला धमकी चीनचे संरक्षण मंत्री जनरल वेई फंगे यांनी यावर अमेरिकेला धमकीच देऊन टाकली आहे. अमेरिकेकडून युध्दाचे वातावरण निर्माण केले गेल्यास बिजिंग कोणतीही किंमत मोजायला तयार असल्याचे म्हटले आहे.