Chinese President Xi Jinping Has Been Diagnosed With Cerebral Aneurysm Hopitalized Last Year
Xi Jinping: शी जिनपिंग यांच्या तब्येतीबाबत मोठी बातमी; चीन प्रशासनाची झोप उडाली, लोक हैराण By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 03:15 PM2022-05-11T15:15:29+5:302022-05-11T15:20:28+5:30Join usJoin usNext अमेरिका चीन आणि रशियासोबत दुहेरी युद्धाच्या स्थितीसाठी तयार आहे. पण अमेरिकेच्या दोन्ही शत्रू देशांचे बडे नेते सध्या आजारी आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आजारपणाची बातमी नुकतीच समोर आली होती. आता एका अहवालानुसार, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना मेंदूच्या गंभीर आजाराने ग्रासले आहे, ज्यामुळे त्यांना २०२१ मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सेरेब्रल एन्युरिझमने(Cerebral Aneurysm) ग्रस्त आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वत:च्या आजारावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी पारंपरिक चिनी औषधांनी उपचार करणे पसंत केले आहे. शी जिनपिंग यांच्या आजारपणाची बातमी आता आली असली तरी त्यांची तब्येत बिघडल्याची चर्चा कायम सुरू होती. कारण कोविड-१९ महामारीच्या सुरुवातीपासून ते बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकपर्यंत ते कोणत्याही परदेशी नेत्याला भेटले नव्हते. मार्च २०१९ मध्ये इटलीच्या प्रवासादरम्यान जिनपिंग यांना चालताना त्रास होत असल्याचे दिसून आले. त्याचवेळी फ्रान्सच्या या दौऱ्यात त्यांना बसायला त्रास होत होता, त्यामुळे त्यांना आधार दिला होता सेरेब्रल एन्युरिझम म्हणजे काय? शी जिनपिंग यांना सेरेब्रल एन्युरिझम नावाचा मेंदूचा आजार आहे. ज्यामध्ये मेंदूच्या आतील एक धमनी विस्तारित होते. यामुळे धमनीच्या वरच्या बाजूस नुकसान होते. जर ते जास्त पसरले तर ते फुटण्याचा धोका वाढतो. मात्र सर्व एन्यूरिज्म फुटत नाहीत. परंतु एकाच रुग्णामध्ये अनेक एन्यूरिज्म आढळल्यास ते धोकादायक ठरते. या आजारामुळे रुग्णाला डोकेदुखी, नेत्रदुखी, दृष्टी कमी होणे इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. शी जिनपिंग सध्या या आजाराने ग्रासले आहेत. अलीकडेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे आजारी असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. पण आता त्यांच्या एका व्हिडीओने त्याला आणखी चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडिओमध्ये पुतिन यांना विजय दिनाच्या परेडमध्ये खोकला येत असून त्यांनी आपले पाय ब्लँकेटने झाकले आहेत. त्याचवेळी, काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की पुतिन यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे रशियाचे पुतिन आणि चीनचे जिनपिंग यांच्या आजारपणाची चर्चा जगातील अनेक देशांमध्ये आहे. शी जिनपिंग हे आजारी असल्याची बातमी अशावेळी समोर आली आहे. जेव्हा कोरोना महामारीमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर संकट उभं राहिले आहे. यूक्रेन-रशिया युद्धामुळे आणि कोरोनामुळे चीनमध्ये गॅस आणि तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. टॅग्स :चीनchina