Chinese scientists consider it is an opportunity to find another Earth-like planet, say Earth 2.0
...तर पृथ्वीवर जगणं कठीण?; देशातील लोकांना दुसऱ्या पृथ्वीवर नेण्याचा चीनचा ‘प्लॅन’ By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 07:25 PM2022-04-13T19:25:36+5:302022-04-13T19:31:46+5:30Join usJoin usNext चीन त्यांच्या तांत्रिक इनोवेशन आणि धाडसी मोहिमेसाठी ओळखला जातो. यश-अपयशाची भीती असतानाही तो मंगळ आणि चंद्रावर पोहोचला. स्वतःचे स्पेस स्टेशन बनवत आहे. आता दुसरी पृथ्वी शोधण्याची चीनची योजना आहे. जेणेकरून गरज पडल्यास तो आपले लोक तिथे पाठवू शकेल. चीन सरकारचीही याबाबत योजना आहे. आपल्या सौरमालेच्या बाहेर असा ग्रह शोधण्याची बीजिंगची योजना आहे जो पृथ्वीप्रमाणे जीवनासाठी उपयुक्त आहे. म्हणजेच, सूर्यमालेच्या बाहेर परंतु आपल्या आकाशगंगेच्या आत, अशा तार्याभोवती फिरणारा असा एक्सप्लॅनेट जिथे मानवाला जीवन जगण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. पुढील काही दशकांत पृथ्वीची स्थिती बिघडणार आहे, असं चीनला वाटते, अशा परिस्थितीत तो देशातील लोकांना दुसऱ्या पृथ्वीवर घेऊन जाण्याचा विचार करत आहे. याबाबतचा अहवाल नेचर जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. ही कल्पना चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेसची आहे. जून महिन्यापासून दुसरी पृथ्वी शोधण्याचे कामही अधिकृतपणे सुरू होईल, सरकारकडून परवानगी मिळाल्यास या अभियानासाठी प्राथमिक टप्पा सुरू होईल. त्यासाठी निधी आदींची व्यवस्था करण्यात येणार आहे. उपग्रह बनवले जातील, जे सौरमालेच्या बाहेर इतर पृथ्वीचा शोध घेण्यासाठी जातील. याशिवाय शोध लागलेला ग्रह जीवनासाठी योग्य आहे की नाही हेही ते पाहणार आहे. एखादी व्यक्ती त्यावर जगू शकते किंवा नाही हे तपासणार आहे. सौरमालेच्या बाहेर जाणारा उपग्रह बाह्य ग्रहाच्या रासायनिक रचनेची तपासणी करेल. जेणेकरून ही रसायने जीवसृष्टीच्या उत्पत्तीला आणि त्यांच्या सतत अस्तित्वाला आधार देतील की नाही हे कळू शकेल. याशिवाय चीन काही दुर्बिणींवरही काम करत आहे, त्यांच्याद्वारे ते जीवनसक्षम ग्रहांचा शोध घेतील. चायनीज एकॅडमी ऑफ सायन्सेसच्या अहवालानुसार, चीन सात दुर्बिणींच्या मदतीने सौरमालेबाहेरील दुसऱ्या पृथ्वीचा शोध घेणार आहे. या दुर्बिणींद्वारे ते केप्लर मिशनने शोधलेल्या अशा ग्रहांचा शोध घेईल. दुसऱ्या पृथ्वी शोध पथकात सहभागी असलेले प्रमुख खगोलशास्त्रज्ञ जियान जी म्हणतात की केप्लरची ताकद कमी होती. आमच्याकडे त्यावर चांगला डेटा आहे जियान म्हणाले की, आमचा उपग्रह नासाच्या केपलर दुर्बिणीपेक्षा १०१५ पट अधिक शक्तिशाली असेल. आमचे अंतराळ यान ट्रांजिट पद्धतीद्वारे काम करेल. हा प्रकाशातील अगदी थोडासा बदल देखील पकडेल. आमच्या सहा दुर्बिणी ५०० स्क्वेअर डिग्रीच्या आकाशातील १२ लाख ताऱ्यांचा अभ्यास करतील. यामध्ये कमी प्रकाशातील ताऱ्यांचाही समावेश असेल. तर, नासाचा ट्रान्झिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइट (TESS) यापेक्षा चांगला असेल. सातवे यंत्र गुरुत्वाकर्षण मायक्रोलेन्सिंग टेलिस्कोप असेल, जे नेपच्यून आणि प्लूटोसारखे ग्रहांचा शोध घेईल. किंवा ते त्यांच्या तारेपासून दूर असू शकतात. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने आतापर्यंत पाच हजाराहून अधिक बाह्य ग्रहांचा शोध लावला आहे. हे सर्व आकाशगंगेत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ ग्रह शोधले गेले, त्यांच्यावर कोणताही अभ्यास झालेला नाही. अभ्यास केला जात आहे. सापडलेल्या ग्रहांमध्ये लहान-मोठे सर्व प्रकारचे ग्रह आहेत. त्यांची रचना आणि स्थितीही वेगळी आहे. यातील काही खडकाळ आहेत. काही लहान आहेत, काही गुरू ग्रहासारख्या वायूपासून बनलेले आहेत. ते त्यांच्या ताऱ्यांभोवती फिरत आहेत अनेक बाह्य ग्रहाच्या मधोमध, जिथे अनेक सुपर अर्थ आणि मिनी नेपच्यून आहेत, चीनला पहिल्या काही वर्षांत डझनभर इतर पृथ्वीसारखे ग्रह सापडतील अशी अपेक्षा आहे. आमच्याकडे पुरेसा डेटा आहे, त्या आधारे आम्ही तपास सुरू करू, असे जियान जी म्हणाले. दुसरी जमीन मिळवून चांगले आंतरराष्ट्रीय करार करता येतील असंही चीनला वाटतं. टॅग्स :चीनchina