Comet swan will pass through the earth In the next 24 to 36 hours pnm
अवघं आसमंत लखलखणार; पुढील २४ ते ३६ तासांत अवकाशात विहंगम दृश्य पाहता येणार By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 11:46 AM2020-05-12T11:46:09+5:302020-05-12T11:55:05+5:30Join usJoin usNext अंतराळात अनेक रहस्यमय गोष्टी आहेत. परंतु हे खरे आहे की, अवकाशात आपल्याला बर्याचदा सुंदर आणि आश्चर्यकारक दृश्ये पाहायला मिळतात. पुढील २४ ते ३६ तासात आपल्याला आकाशात फटाक्यांसारखे दृश्य पाहायला मिळेल. आकाशातून चमकणारे धूमकेतू जेव्हा पृथ्वीच्या शेजारुन जाताना पाहायला मिळतील. हे एक अतिशय सुंदर दृश्य असेल. आपण त्यांना दुर्बिणीशिवाय उघड्या डोळ्यांनी पाहू शकता. मे महिन्यात ही दृश्य दोनदा पाहायला मिळतील. एक १३ मे रोजी पृथ्वीपासून सुमारे ८.३३ कोटी किलोमीटर अंतरावरुन जाईल. त्याचे नाव कॉमेट स्वान(Comet Swan) आहे, सध्या ते पृथ्वीपासून सुमारे ८.५० कोटी किलोमीटर अंतरावर आहे. अत्यंत वेगाने ते पृथ्वीच्या दिशेने येत आहे. यानंतर २३ मे रोजी, कॉमेट एटलस पृथ्वीच्या बाजूने जाईल. १३ मे रोजी दिसणारा धूमकेतू स्वान सुमारे एक महिन्यापूर्वी ११ एप्रिल रोजी खगोलशास्त्रज्ञ मायकेल मॅटियाझझोने शोधला होता. तो नासाच्या सोलर एँन्ड हेलिओस्फेरिक ऑब्जरवेटरी (एसओएचओ) मधील डेटामधून पाहात होता. त्यावेळी त्याला एक चित्र सोहो सोलर सोलार विंड एनिसोट्रोपीज इन्स्ट्रुमेंट (सोहो स्वान) मध्ये दिसले. मग त्याचे नाव स्वान ठेवले गेले. विषुववृत्तीय रेषेच्या दक्षिणेस राहणाऱ्यांनाच धूमकेतू स्वान दिसू शकेल. दुःखाची बाब म्हणजे भारत विषुववृत्ताच्या उत्तरेस आहे, म्हणून इथले लोक हे धूमकेतू उघड्या डोळ्यांनी पाहू शकणार नाहीत. धूमकेतू एटलसचा शोध २८ डिसेंबर २०१९ रोजी लागला. त्यावेळी त्याची ब्राइटनेस खूप हळू होती. पण आत्ता ती जोरात चमकत आहे. एटलासचे नाव अमेरिकेच्या हवाईयन बेटांवर अॅस्टेरॉइड टेरिस्ट्रियल इम्पॅक्ट लास्ट अॅलर्ट सिस्टम (अटलास) असे ठेवले गेले आहे. त्याचे स्वतःचे ट्विटर हँडल देखील आहे. स्वान उपकरणाचा उपयोग सौर यंत्रणेत हायड्रोजन शोधण्यासाठी केला जातो. परंतु त्याच्या मदतीने मायकेलला स्वान धूमकेतू सापडला. आता हा धूमकेतू १३ मे रोजी पृथ्वीच्या शेजारुन जाईल. या धूमकेतूचे ट्विटर हँडल देखील आहे. विषुववृत्तीय रेषेच्या दक्षिणेस राहणाऱ्यांनाच धूमकेतू स्वान दिसू शकेल. दुःखाची बाब म्हणजे भारत विषुववृत्ताच्या उत्तरेस आहे, म्हणून इथले लोक हे धूमकेतू उघड्या डोळ्यांनी पाहू शकणार नाहीत. दुर्बिणीद्वारे हे भारतीय लोक पाहू शकतात. हे पाइसेज कॉन्स्टीलेशन (मीन नक्षत्र) च्या बाजूने वेगाने येत आहे. आपणास हिरव्या रंगात झपाट्याने चमकत दिसेल. यानंतर २३ मे रोजी, पृथ्वीच्या बाजूने आणखी एक धूमकेतू जाईल. त्याचे नाव धूमकेतू एटलस आहे. याला Comet C / 2019 Y 4 ATLAS देखील म्हणतात. आतापर्यंत त्याचे अंतर कळू शकले नाही. हे पृथ्वीच्या बाजूने केव्हा जाईल हे देखील माहित नाही, परंतु लवकरच पृथ्वीवरुन जाण्याची गती आणि वेळ वैज्ञानिकांना सापडेल. हे भारतातून उघड्या डोळ्यांनी पाहता येईल अशी शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.