Conclusions after 148 research studies, these are the 2 major symptoms of corona
148 संशोधनांच्या अभ्यासानंतर निष्कर्ष, कोरोनाची हीच 2 प्रमुख लक्षणे By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 11:23 AM2020-06-28T11:23:51+5:302020-06-28T11:30:04+5:30Join usJoin usNext जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल 1 कोटीच्या पुढे गेली असून 5 लाखांहून अधिक जणांनी यामुळे जीव गमावला आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असून आकडेवारी नवा उच्चांक गाठत आहे. देशातील रुग्णसंख्येने पुन्हा एकदा उच्चांक गाठला असून धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 19,906 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 410 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 5,28,859 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 16,095 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रविवारी (28 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 19,906 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पाच लाख 28 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सोळा हजारांवर पोहोचला आहे. कोरोना व्हायरसच्या लक्षणासंदर्भात जगभरातील विविध देशांनी संधोधन केले आहे. आता, ब्रिटनमधील संशोधकांनी आत्तापर्यंत झालेल्या सर्वच संशोधनाचा अभ्यास केला आहे. संशोधकांनी आत्तापर्यंतच्या तब्बल 148 संशोधनाची समिक्षा करुन एक निष्कर्ष काढला आहे. कोरोनाची प्रमुख लक्षणे ही ताप, कोरडा खोकला, घशात खवखव, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास, चव नसणे, वास न येणे आणि शरीरावर रॅशेज असल्याचे आत्तापर्यंत पुढे आले आहे. आता, 148 संशोधनांचा अभ्यास केल्यानंतर कोरोनाची प्रमुख दोनच लक्षणे निष्कर्षात आली आहेत, ताप आणि खोकला हीच प्रमुख दोन लक्षणे असल्याचे संशोधकांनी म्हटलं आहे. कोरोनाग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये हीच दोन लक्षणे सर्वाधिक आढळून आली आहेत. संशोधकांनी आत्तापर्यंतच्या कोरोनाच्या लक्षणाचा अभ्यास करुन हा निष्कर्ष काढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं जारी केलेल्या लक्षणांमध्ये वास न येणे, थकवा यांचा समावेश होता. याचाही अभ्यास या संशोधकांनी केला आहे. ब्रिटेनमधील लीड्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी ब्रिटन, चीन आणि अमेरिकेसह 9 देशातील 24 हजार कोरोनाबाधित रुग्णांना असलेल्या लक्षणांचा अभ्यास केला आहे. त्यानंतर, 148 संशोधनांचाही अभ्यास करत हा निष्कर्ष काढला आहे. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याहॉस्पिटलभारतcorona virushospitalIndia