corona vaccination : गर्भवतीला दिली होती कोरोनावरील लस, जन्मलेल्या बाळावर दिसून आला असा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 00:46 IST2021-03-18T00:39:13+5:302021-03-18T00:46:19+5:30

corona vaccination : कोरोना लसीकरणादरम्यान, एका गर्भवतीला कोरोनाविरोधातील लस देण्यात आली होती. आता जन्माला आलेल्या तिच्या बाळामध्ये काही खास बदल दिसून आले आहेत

जगभरात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी जास्त होत आहे. त्यादरम्यान कोरोनाविरोधातील लसीकरणही जोरात सुरू आहे. या लसीकरणादरम्यान, एका गर्भवतीला कोरोनाविरोधातील लस देण्यात आली होती. आता जन्माला आलेल्या तिच्या बाळामध्ये काही खास बदल दिसून आले आहेत.

अमेरिकेमध्ये एका गर्भवतीला कोरोनाची लस देण्यात आली होती. या महिलेने आता सुदृढ मुलीला जन्म दिला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या नवजात अर्भकाच्या शरीरात कोरोनाविरोधातील अँटीबॉडी दिसून आल्या आहेत. ही जगातील अशाप्रकारची पहिलीच घटना आहे.

अमेरिकेमध्ये एका गर्भवतीला कोरोनाची लस देण्यात आली होती. या महिलेने आता सुदृढ मुलीला जन्म दिला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या नवजात अर्भकाच्या शरीरात कोरोनाविरोधातील अँटीबॉडी दिसून आल्या आहेत. ही जगातील अशाप्रकारची पहिलीच घटना आहे.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार असे सांगण्यात येत आहे की, मुलीच्या शरीरामध्ये असलेल्या अँटीबॉडी काही वर्षांपर्यंत शरीरामध्य राहण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीच्या शरीरात अँटीबॉडी आहेत. मात्र त्यांचे प्रमाण कमी आहे.

ही महिला पेशाने आरोग्य कर्मचारी आहे. मात्र तिचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. ३६ आठवड्यांची गर्भवती असताना तिला कोरोनाविरोधातील लस देण्यात आली होती. त्यानंतर काही आठवड्यांनंतर तिने मुलीला जन्म दिला.

यापूर्वी झालेल्या अध्ययनामधून गर्भवतींना फ्लू आणि टीडीएपी लस दिल्यानंतर प्लेसेंटाच्या माध्यमातून मुलांपर्यंत अँटीबॉडी पोहोचत असल्याचे समोर आले होते. मात्र कोरोना लसीबाबत आतापर्यंत फारच त्रोटक माहिती उपलब्ध आहे.