चीनची कोरोना लस सर्वाधिक महाग, सर्वांत स्वस्त कोणाची? पाहा, संपूर्ण प्राइज लिस्ट By देवेश फडके | Published: March 3, 2021 11:55 AM 2021-03-03T11:55:26+5:30 2021-03-03T12:03:19+5:30
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध कंपन्यांनी कोरोना लस (Corona Vaccine Price List) शोधून काढली आहे. कोरोना लसीसाठी काही देशांमध्ये पैसे आकारले जात आहेत, तर काही ठिकाणी नागरिकांना मोफस लस दिली जात आहे. चीनमध्ये विकसित करण्यात आलेली कोरोना लस सर्वांत महाग असून, भारतात विकसित करण्यात आलेली कोरोना लस सर्वांत स्वस्त असल्यामुळे जगभरातील गरीब देश भारताकडे आशेने पाहत आहेत, असे म्हटले जात आहे. (corona vaccine dose cheapest in India price comparison with other vaccines in the world) कोरोना संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी शास्त्रज्ञांनी दिवस-रात्र मेहनत करून लसीचा शोध लावला. कोरोना संकटातून अद्यापही जग संपूर्णपणे सावरलेले नाही. तरीही कोरोना लसीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवून कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न जगभरात सुरू झाले आहेत. (Corona Vaccine Price List)
जगभरातील सुमारे ८४ देशांमध्ये कोरोना लसीकरण सुरू झालेले आहे. तसेच भारतात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा ०१ मार्चपासून सुरू झालेला आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेते, मंत्री, खासदार, आमदार यांनी कोरोना लस घेतल्याचे समजते.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध कंपन्यांनी कोरोना लस शोधून काढली आहे. कोरोना लसीसाठी काही देशांमध्ये पैसे आकारले जात आहेत, तर काही ठिकाणी नागरिकांना मोफस लस दिली जात आहे. (corona vaccine dose cheapest in india price comparison with other vaccines in the world)
भारताने सर्वांत कमी वेळात कोरोना लस निर्मिती केली आहे. अनेक देशांना कोरोना लसीची निर्यातही भारतातून केली जात आहे. कोरोना लसीच्या किमतींमध्ये भारताने बाजी मारली असल्याचे पाहायला मिळत आहे. चीनमध्ये विकसित करण्यात आलेली कोरोना लस सर्वांत महाग असून, भारतात विकसित करण्यात आलेली कोरोना लस सर्वांत स्वस्त असल्याचे सांगितले जात आहे.
चीन आपले उत्पादन बाजारात कमी किमतीत सादर करून संपूर्ण मार्केटवर कब्जा मिळवतो, असा आतापर्यंतचा सर्वांचा अनुभव आहे. मात्र, कोरोना लसींच्या बाबतीत चीन चितपट झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारताच्या तुलनेत चीनची कोरोना लस ९ पट जास्त असल्याचे सांगितले जात आहे.
कोरोना लसीची किंमत कमी असल्यामुळे जगभरातील गरीब देश भारताकडे आशेने पाहत आहेत. भारतात विकसित केलेल्या सीरमच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोरोना लसीची किंमत २५० रुपये प्रतिडोस आहे. यामध्ये १५० रुपये लसीची मूळ किंमत आणि १०० रुपये सर्व्हिस चार्ज आकारण्यात येत आहे.
जगभरातील ९ देशांना कोरोनाची लस विकसित करण्यात यश आले आहे. चीनच्या कोरोना लसीची किंमत २२०० रुपये आहे. चीनमधील सायनोव्हॅक या कंपनीने ती विकसित केली आहे. अमेरिकेत विकसित करण्यात आलेल्या कोरोना लसीच्या प्रति डोसची किंमत भारतीय चलनाप्रमाणे १४०० रुपये आहे.
अमेरिकेतील कोरोना लस फायझर कंपनीने विकसित केली आहे. तसेच युरोपिय युनियनमध्ये विकसित करण्यात आलेल्या कोरोना लसीची किंमत १३०० रुपये प्रति डोस आकारण्यात येत आहे. तर, रशियाने विकसित केलेल्या कोरोना लसीची किंमत ७३० रुपये प्रति डोस आहे.
दक्षिण आफ्रिकामध्ये कोव्हिशिल्डच्या कोरोना लसीच्या एका डोसची किंमत ३९० रुपये आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्येही कोरोनाची लस याच किमतीला उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे.
ब्राझीलमध्ये विक्रीस उपलब्ध असलेल्या कोव्हिशिल्ड कोरोना लसीच्या एका डोसची किंमत ३७० रुपये आकारण्यात येते. तर भारतात उपलब्ध असलेल्या कोरोना लसीच्या एका डोसची किंमत २५० रुपये आहे. जागतिक पातळीवरील काही देशांमध्ये कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यास प्रारंभ झाला आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने एकच डोस असलेली कोरोना लस विकसित केली असून, अमेरिकेने त्याला मंजुरी दिली आहे.