Corona Virus : बापरे! जगभरात ओमायक्रॉनचे 300 व्हेरिएंट; कोरोना पाठ न सोडण्यामागचं तज्ज्ञांनी सांगितलं कारण By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 12:43 PM 2022-10-20T12:43:54+5:30 2022-10-20T13:12:12+5:30
Corona Virus : संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत असताना नवीन व्हेरिएंट हे सातत्याने समोर येत आहे. कोरोनाचा वेग थोडा मंदावला असला तर लोकांच्या मनात अद्यापही भीतीचे वातावरण आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 63 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 631,541,371 झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 6,577,050 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 610,452,160 लोकांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे.
कोरोना पाठोपाठ ओमायक्रॉनने जगाचं टेन्शन वाढवलं आहे. असं असताना आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत असताना नवीन व्हेरिएंट हे सातत्याने समोर येत आहे. कोरोनाचा वेग थोडा मंदावला असला तर लोकांच्या मनात अद्यापही भीतीचे वातावरण आहे.
येत्या काही आठवड्यात कोरोनाची नवी लाट येऊ शकते असं म्हटलं जात आहे. ओमायक्रॉनचा नवा व्हेरिएंट यामागचं कारण असू शकतो. सध्या जगभरात ओमायक्रॉनचे 300 सबव्हेरिएंट आहेत. यातील जास्त हे BA.5 या व्हेरिएंटचे सबव्हेरिएंट आहेत. नव्या सब व्हेरिएंटचा शोध घेण्यासाठी ट्रेकिंग, टेस्टिंग आणि सिक्वेसिंग महत्त्वाचं आहे.
जागतिक आरोग्य संघटना आणि त्यासोबतच अनेक शास्त्रज्ञ हे नव्य़ा मॉड्यूलेशनचा शोध घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे 300 हून अधिक सब व्हेरिएंट अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे. यातही जवळपास 76 टक्के हे BA.5 चेच सब व्हेरिएंट आहेत.
WHO च्या एका कमेटीने डॉ. टेड्रोस अधनोम घेब्रेयसस यांना दिलेल्या एका रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. एवढंच नाही तर कमेटीने नव्या व्हेरिएंचा शोध घेण्यासाठी सर्वेलान्स, ट्रॅकिंग आणि टेस्टिंग ही रणनीति महत्वाची असल्याचं म्हटलं आहे. तसेच सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे,
कोरोना संक्रमणानंतर होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांमुळे, त्रासामुळे आरोग्य विभागावर येणारा ताण हा अधिक चिंता वाढवणारा आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉनच्या नव्या सब व्हेरिएंटची भारतात ओळख पटवण्यात यश आलं आहे. BA.5.1.7 असं या नव्या व्हेरिएंटचं नाव असल्याचं म्हटलं आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या गंभीर इशाऱ्यानुसार, नवा व्हेरिएंट हा अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक वेगाने पसरत आहे. यामध्ये जर निष्काळजीपण केला तर तर कोरोनाचं संक्रमण हे वाढू शकतं. चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यामागे हेच कारण आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिय, ब्रिटन आणि बेल्जियममध्ये नवा व्हेरिएंट सापडला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.