corona virus news - man quarantining hotel stepped out room fined taiwan
बापरे! क्वारंटाइनमधून फक्त ८ सेकंदासाठी खोलीबाहेर आला अन् अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 03:00 PM2020-12-09T15:00:50+5:302020-12-09T15:15:15+5:30Join usJoin usNext कोरोनावर मात करण्यात तैवानला यश आल्याचे म्हटले जाते. चीनचा शेजारी देश असूनही तैवानमधील कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. मात्र, तैवानमधील कोरोना नियम अत्यंत कठोर आहेत, कारण एका व्यक्तीला ८ सेकंदाच्या चुकीसाठी अडीच लाख रुपये दंड आकारण्यात आला. मूळचे फिलिपिन्समधील असलेल्या एका व्यक्तीला तैवानमधील गौशंग शहरातील हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. तैवानच्या सेंट्रल न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, क्वारंटाइनमध्ये असताना ही व्यक्ती काही सेकंदसाठी खोलीतून बाहेर निघाली आणि हॉलमध्ये गेली, असे आरोग्य विभाग म्हटले आहे. ही व्यक्ती खोलीबाहेर येऊन काही सेकंद हॉलमध्ये येण्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाला घटनेची माहिती दिली. आरोग्य विभागाने त्या व्यक्तीला सुमारे अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला. तैवानमधील क्वारंटाइन नियमांनुसार, लोकांना खोलीत कितीही दिवस राहावे लागले, तरीसुद्धा त्यांना त्यांच्या खोल्या सोडण्याची परवानगी नाही. गौशंग शहरात 56 क्वारंटाइन हॉटेल आहेत, ज्यामध्ये तीन हजार खोल्या क्वारंटाइनसाठी ठेवण्यात आल्या आहेत. जवळपास २ कोटी ३० लाख लोकसंख्या असलेल्या तैवानमध्ये आतापर्यंत फक्त ७१६ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे सात लोकांचा मृत्यू झाला आहे. तैवानने इतर देशांप्रमाणे लॉकडाउन केले नाही आणि देशातील सामान्य लोकांच्या हालचालींवर निर्बंध घातले नाहीत. दरम्यान, कोरोनामुळे अनेक देशात हाहाकार माजला आहे. अमेरिका, फ्रान्स, इटली, चीन, भारत यासांरख्या देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याआंतरराष्ट्रीयआरोग्यcorona virusInternationalHealth