Corona's blow postpones general election in New Zealand
कोरोनाचा फटका, न्यूझीलंडमध्ये सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलल्या By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 04:15 PM2020-08-17T16:15:31+5:302020-08-17T16:21:18+5:30Join usJoin usNext कोरोना महामारीवर विजय मिळविल्यानंतर 100 दिवस एकही कोरोना पेशंट न सापडल्याने जगभरात न्युझीलंडचा स्तुती होऊ लागली होती. मात्र, अवघ्या दोन दिवसांनीच न्युझीलंडवर पुन्हा कोरोनाचे संकट दाटले असून ऑकलंडमध्ये चार नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. न्यूझीलंडमध्ये कोरोनाने रिव्हर्स गेअर टाकल्याचं दिसून येतंय. कारण, तीन दिवसांतच न्यूझीलंडमध्ये कोरोनाचे 30 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, न्यूझीलंड सरकारपुढे कोरोनामुक्तीचे आव्हान उभे ठाकले आहे. न्यूझीलंडमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची वारे असून कोरोनामुळे या निवडणुकांच्या नियोजनावरही पाणी फेरले जाणार आहे. कारण, निवडणुका घेणे शक्य नसल्याचं दिसून येतंय. न्यूझीलंडच्या मुख्य विरोधी पक्षानेही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. कोरोनाच्या निर्बंधामुळे विरोधी पक्षांना आपले निवडणूक प्रचार थांबवावे लागले. हे लक्षात घेता पक्षांनी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. न्यूझीलंडमध्ये आता 17 ऑक्टोबरनंतरच सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी निवडणुकीची तारीख यानंतरही पुढे ढकलण्याची शक्यता नाकारली होती. देशात कोरोना विषाणूचा पुन्हा संसर्ग झाल्यानंतर निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका न्यूज कॉन्फरन्समध्ये आर्डेन म्हणाल्या की, 17 ऑक्टोबरपर्यंत पक्षांना स्वतःला तयार करण्यासाठी चांगला वेळ मिळेल. न्यूझीलंडमध्ये 19 सप्टेंबर रोजी सार्वत्रिक निवडणुकीची तारीख जाहीर होईल. ऑकलंडमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर पंतप्रधानांकडे निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता. यापूर्वी, 102 दिवसांमध्ये न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. पंतप्रधानांनीही कोरोनापासून मुक्त होण्याची घोषणा केली होती, परंतु पुन्हा एकदा न्यूझीलंडमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने सरकारला हा निर्णय़ घ्यावा लागला. आपला पाठिंबा वाढवण्यासाठी पंतप्रधान कोरोना संकटाचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर, पंतप्रधान आर्डेन म्हणाल्या की, त्यांनी गव्हर्नर जनरल यांना निवडणुकीसाठी नवीन तारीख निश्चित करण्यास सांगितले आहे. आर्डेनच्या यांना ऑक्टोबरनंतर निवडणूक पुढे ढकलण्याची इच्छा नाही. आर्डेन म्हणाल्या की, आपण सर्वजण समान परिस्थितीशी झगडत आहोत, प्रत्येकजण एकप्रकारच्या वातावरणात प्रचार करत आहेत. न्यूझीलंडच्या कायद्यानुसार 21 नोव्हेंबरपूर्वी निवडणुका घेणे बंधनकारक आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्यानिवडणूकन्यूझीलंडcorona virusElectionNew Zealand