Coronavirus : In 1918 an outbreak of the Spanish flu name was spread mac
Coronavirus : कोरोनापेक्षा 'हा' आजार होता भयंकर; 10 कोटी लोकांचा झाला होता मृत्यू By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 05:44 PM2020-03-15T17:44:18+5:302020-03-15T17:58:15+5:30Join usJoin usNext जगभरात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. अनेक देशात कोरोनाच्या धास्तीनं शाळा, कॉलेजसह मॉल्स बंद ठेवण्यात आले आहेत. चीनच्या वुहानमध्ये केंद्रबिंदू असलेल्या या कोरोनानं जगभरात पाय पसरले आहेत. जगभरात 156,396 कोरोना व्हायरसनं संक्रमित झालेले रुग्ण आढळून आले असून, त्यात चीनमध्ये जवळपास 80955 कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. त्याच्या खालोखाल इटलीमध्ये 21,157 रुग्ण संक्रमित असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत जगात कोरोना संक्रमित 5833 लोकांचा मृत्यू झाला असून, त्यात 3085 मृत्यूचा आकडा एकट्या चीनमधला आहे. भारतात देखील कोरोनामुळे आतापर्यत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 96वरून 108वर पोहोचली आहे. सध्या कोरोनामुळे जगभरात भितीचे वातावरण पसलेले आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का गेल्या 100 वर्षापूर्वी कोरोनापेक्षा भयंकर असा आजार जगभरात पसरला होता. 1918 मध्ये ‘स्पॅनिश फ्लू’नावाचा एक आजार पसरला होता. फ्रान्सच्या सीमेजवळील खंदकांमधील घाणीमुळे सैन्य प्रशिक्षण शिबिरात या आजाराची सुरूवात झाली. पहिले महायुद्ध 1914 ते 1918 साली झाले होते. 1918 ला युद्ध संपल्यानंतर घरी परतणाऱ्या संक्रमित सैनिकांसह स्पॅनिश फ्लू सर्वत्र पसरला होता. 'स्पॅनिश फ्लू'मुळे जगभरातील जवळपास 9 ते 10 कोटी लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्पॅनिश फ्लू जेव्हा पसरला, त्याकाळी नुकताच विमान प्रवास सुरू झाला होता. त्यामुळे त्या काळात हा आजार इतर भागात पसरला नाही. त्यावेळी हा आजार केवळ रेल्वे आणि बोटीतून प्रवास करणाऱ्यांद्वारेच खूप कमी प्रमाणात पसरला. स्पॅनिश फ्लू पसरल्यानंतर त्याकाळी देखील सरकारने शाळा बंद ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी जमा न होणे आणि गावापर्यंत पोहण्याचे रस्ते बंद करण्यासारखे उपाय केले होते. डॉक्टर स्पॅनिश फ्लूला इतिहासातील सर्वात मोठा जनसंहार मानतात. यामुळे अनेक तरूण आणिन निरोगी लोकांचा मृत्यू झाला. या आजारामुळे शरीराची प्रतिकार शक्ती नष्ट होते. यामुळे सायटोकीन स्टॉर्म नावाची प्रतिक्रिया होतेव फुफ्फुसांमध्ये पाण्याने भरले जाते, ज्यामुळे हा आजार इतरांपर्यंत पसरतो. झोपडी अथवा ज्या ठिकाणी स्वच्छता आणि पोषक आहाराची कमी होती अशा ठिकाणा राहणाऱ्या लोकांचा स्पॅनिश फ्लूमुळे मृत्यू झाला होता. टॅग्स :कोरोनाआंतरराष्ट्रीयफ्रान्सभारतcorona virusInternationalFranceIndia