coronavirus: गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 20:16 IST2020-06-08T19:54:44+5:302020-06-08T20:16:57+5:30
गाईच्या शरीरामध्ये असलेल्या अँटीबॉडीचा वापर कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी करता येऊ शकेल, असा दावा अमेरिकेतील एका बायोटेक कंपनीने केला आहे.

कोरोना विषाणूवर लस शोधण्यासाठी सध्या जगभर संशोधन सुरू आहे. या संशोधनांचे नवनवे निष्कर्ष समोर येत आहेत. दरम्यान, आता कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी शास्रज्ञांना एक नवा उपाय सापडला आहे. हा उपाय शास्रज्ञांना चक्क गाईच्या शरीरामध्ये सापडला आहे. गाईच्या शरीरामध्ये असलेल्या अँटीबॉडीचा वापर कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी करता येऊ शकेल, असा दावा अमेरिकेतील एका बायोटेक कंपनीने केला आहे.
अमेरिकेतील बायोटेक कंपनी सॅब बायोथेराप्युटिक्सने सांगितले की, जनुकिय बदल केलेल्या गाईंच्या शरीरातून अँटिबॉडी काढून त्यांच्या माध्यमातून कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठीचे औषध बनवता येऊ शकेल. कंपनी लवकरचा याची वैद्यकीय चाचणी सुरू करणार आहे.
जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिटीमधील संसर्गजन्य आजारांसंबंधीचे फिजिशियन अमेश अदाल्जा यांनी सांगितले की, संबंधित कंपनीने केलेला दावा सकारात्मक, विश्वास वाढवणारा आणि आशादायी आहे. कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आपल्याला अशा विविध हत्यारांची आवश्यकता भासेल.
सर्वसाधारणपणे शास्त्रज्ञ अँटिबॉडीजची तपासणी ही प्रयोगशाळांमध्ये तयार करण्यात आलेल्या कोशिका किंवा तंबाखूच्या झाडांवर करतात. पण बायोथेराप्युटिक्स २० वर्षांपासून गाईंच्या खुरांमध्ये अँटिबॉडीज विकसित करत आहेत.
गाईंमधील रोगप्रतिकारक पेशी अधिक विकसित व्हाव्यात, त्यांना धोकादायक आजारांशी लढता यावे म्हणून संबंधित कंपनी गाईंमध्ये जनुकिय बदल घडवून आणते. तसेच या गाई मोठ्या प्रमाणावर अँटिबॉडीज विकसित करतात, त्यांचा उपयोग माणसांवर उपचार करण्यासाठी करता येऊ शकेल.
पीट्सबर्ग विद्यापीठातील इम्युनोलॉजिस्ट विल्यम क्लिमस्त्रा यांनी सांगितले की, या कंपनीच्या गाईंमध्ये असलेल्या अँटिबॉडीमध्ये कोरोना विषाणूच्या स्पाईक प्रोटिनला संपवण्याची ताकद आहे. गाय ही आपल्यामध्येच एक बायो रिअॅक्टर आहे. ती गंभीर ते अतिगंभीर आजारांचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अँटिबॉडी विकसित करत असते.
बायोथेरापटिक्सचे सीईओ एडी सुलिवन यांनी सांगतले की, गाईंजवळ अन्या छोट्या प्राण्यांच्या तुलनेत अधिक रक्त असते. त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये अँटिबॉडी अधिक प्रमामात बनतात. त्यांच्यावर प्रक्रिया करून नंतर त्या मानवामध्ये वापरता येऊ शकतील.
एडी यांनी सांगितले की, जगातील बहुतांश कंपन्या कोरोना विषाणूशी लढण्यासाठी मोनोक्लोनल अँटिबॉडी विकसित करण्यामध्ये गुंतलेल्या आहेत. मात्र गाईंबाबत सकारात्मक बाब म्हणजे त्या पॉलिक्लोनल अँटिबॉडी तयार करतात. त्या कुठलाही विषाणू नष्ट करण्याच्या बाबतीत कुठल्याही मोनोक्लोनल अँटिबॉडीपेक्षा अधिक सक्षम आहेत.
एडी सुलिवन यांनी सांगितले की, जेव्हा मिडल ईस्ट रेस्पोरेटरी सिंड्रोम आला होता तेव्हा आम्ही हाच मार्ग अवलंबला होता. गाईच्या शरीरात इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक अँटिबॉडी असतात, हे आम्हाला तेव्हाच समजले होते.
सात आठवड्यांच्या आता गाईच्या शरीरामध्ये कोरोना विषाणूविरोधात अँटिबॉडी तयार होत आहेत. तसेच यादरम्यान, गाई जास्त आजारीसुद्धा पडत नाही आहेत. तसेच या अँटिबॉडींनी कोनोना विषाणूच्या स्पाईक प्रोटिनला नष्ट केल्याचेही दिसून आले आहे.
तसेच गाईच्या प्लाझ्माची प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते मानवी प्लाझ्मा थेरेपी म्हणजे कोवेलेसेंट प्लाझ्मा थेरेपीपेक्षा चार टक्क्यांनी अधिक शक्तिशाली आहे. हा कोरोना विषाणूला मानवी शरीरात घुसू देत नाही.
एडी यांनी पुढे सांगितले की, पुढच्या काही आठवड्यांमध्येच आम्ही गाईच्या अँटिबॉडीची माणसांवर वैद्यकीय चाचणी सुरू करणार आहोत. त्यातून ही माणसावर किती उपयुक्त आहे हे समोर येईल. गाईच्या रक्तातून मिळवलेली अँटिबॉडी अन्य औषधांपेक्षा अधिक चांगली असेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.