CoronaVirus चीन पुन्हा जगाला हादरवणार; 'नव्या' दीर्घायुषी कोरोनाचे वागणे आणखी खतरनाक By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 11:44 AM 2020-05-21T11:44:54+5:30 2020-05-21T11:51:29+5:30
नव्या रुग्णांमध्ये सापडलेला कोरोना आधीच्या व्हायरसपेक्षा अधिक जास्त खतरनाक वागत आहे. खूप कमी वेळात हा जिवाणू स्वत:ला बदलत असून रुग्णांना बरे होण्यासाठीही जास्त वेळ लागत आहे. कोरोना व्हायरसची सुरुवात चीनमधून झाली होती. जगात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५० लाखांवर गेली असून आधीच जग हादरलेले असताना चीनमधून आणखी एक धक्कादायक माहिती येत आहे.
नव्या रुग्णांमध्ये सापडलेला कोरोना आधीच्या व्हायरसपेक्षा अधिक जास्त खतरनाक वागत आहे. खूप कमी वेळात हा जिवाणू स्वत:ला बदलत असून रुग्णांना बरे होण्यासाठीही जास्त वेळ लागत आहे.
आणखी एक चिंतेची बाब म्हणजे हा कोरोना खूप काळ या रुग्णांच्या शरीरामध्ये जिवंत राहिलेला आहे.
चीनच्या जिलिन आणि हेईलांगजिआंगमध्ये हे रुग्ण सापडत आहेत. त्यांच्या शरीरामध्ये खूप काळापासून कोरोना आहे. वुहानमध्ये जेवढा वेळ रुग्णांना बरे होण्यासाठी लागत होता, त्यापेक्षा जास्त वेळ इथे लागत असल्याचे तेथील वरिष्ठ डॉक्टरनी सांगितले.
रुग्णांमध्ये तापाचे लक्षण दिसतच नाहीत. मात्र, हा व्हायरस थेट फुफ्फुसावर हल्ला करत असल्याचे चीनचे राष्ट्रीय आरोग्या आयोगाचे तज्ज्ञ क्यू हेइबो यांनी सांगितले.
चीनच्या उत्तर पूर्वेकडील प्रांतांमध्ये गेल्या काही दिवसांत नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोना महामारीची दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेईबो यांनी सांगितले की, वुहानपेक्षा हा व्हायरस जास्त खतरनाक आहे. यामुळे त्याच्या संक्रमणाचा वेगही जास्त आहे. लोक कुटुंबासोबत असताना जास्त काळजी घेत नसल्याने आता जास्त रुग्ण सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मंगळवारपर्यंत जिलिन प्रांतामध्ये कोरोनाचे १३३ रुग्ण सापडले होते. मंगळवारी चार नवे रुग्ण सापडले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. २५ रुग्णांवर उपचार सुरु असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. तसेच या संक्रमितांच्या संपर्कात आल्याने 1,181 लोकांना वेगळे ठेवण्यात आले आहे.
मंगळवारी वुहानमध्येही १५ नवीन रुग्ण सापडले आहेत. महत्वाचे म्हणजे या रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. १.१२ कोटी लोकसंख्येती सामुहिक तपासणी केली जात असताना हे आढळले आहेत .
चीनच्या आधीच्या व्हायरसने आधीच जगभरात थैमान घातले आहे. जगात जर या व्हायरसने असेच रुप बदलले तर त्यामुळे उडणारा हाहाकार आणखी मोठा असणार आहे.