CoronaVirus News : कोरोनापुढे 'हा' देश हतबल! आकडेवारी जाहीर न करण्याचा घेतला निर्णय By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 05:06 PM 2020-06-08T17:06:09+5:30 2020-06-08T17:16:21+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे आतापर्यंत 406,549 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 7,113,012 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत.
अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत 406,549 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 7,113,012 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.
कोरोनापुढे ब्राझीलही हतबल झाला आहे. कोरोना संदर्भातील आकडेवारी जाहीर न करण्याचा निर्णय या देशाने घेतला आहे. ब्राझीलमध्ये मृतांची संख्या वाढत आहे.
सरकारी संकेतस्थळावरून एकूण करोनाबाधित आणि मृतांची संख्या यांची आकडेवारी काढण्याचे आदेश ब्राझीलच्या सरकारने दिले आहेत.
कोरोनाग्रस्तांची संख्या आणि मृत्यू यांची संख्या जाहीर न करण्याचा निर्णय घेतल्याने ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे.
फक्त गेल्या 24 तासांची माहिती देण्यात येणार आहे. राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांच्या या निर्णयाचा स्थानिक माध्यमांनी आणि संसदेतील काही लोकांनी विरोध केला आहे.
ब्राझीलमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सलग चार दिवस एक हजारांहून अधिक जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही 70 लाखांच्या वर गेली आहे. जगामध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या संख्येत ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे.
ब्राझीलमध्ये अमेरिका आणि ब्रिटननंतर सर्वाधिक मृतांच्या संख्येची नोंद करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.