Coronavirus: China Developed four antibodies for fight against Corona pnm
Coronavirus: कोरोना विषाणूवर आता चहुबाजुने हल्ला; अखेर चीनच्या वैज्ञानिकांनी शोधला ‘हा’ मोठा फॉर्म्युला! By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 09:03 AM2020-05-15T09:03:12+5:302020-05-15T09:07:41+5:30Join usJoin usNext चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. आतापर्यंत ५० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३ लाखांपर्यंत लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणू हा नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. चीनच्या वुहान येथील लॅबमध्येच या विषाणूने जन्म घेतला. त्यामुळे जगावर संकट आलं आहे असा आरोप अनेकांनी चीनवर केला आहे. चीनी वैज्ञानिकांनी कोरोना विषाणू नष्ट करण्याचं सूत्र शोधलं आहे. चिनी शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, कोरोनाला एका अँटीबॉडीने पराभूत करणे अवघड आहे, म्हणून चार अँटीबॉडीने एकत्रितपणे त्यास हरवावं लागेल. चार अँटीबॉडी एकत्रपणे कोरोना विषाणूवर हल्ला करतील. कोरोना विषाणूच्या बाह्य काटेरी प्रोटीन लेयर संपुष्टात आणतील. त्यामुळे ते आपल्या शरीराच्या पेशींना चिकटणार नाही त्याने विषाणूची गती कमी होईल अन् अखेर मारला जाईल. कोरोना विषाणूपासून बऱ्या झालेल्या रूग्णाच्या शरीरातून चार अँटीबॉडी काढण्यात २४ पेक्षा अधिक वैज्ञानिकांना यश आलं आहे. या चार अँटीबॉडीजचे कॉकटेल कोरोना व्हायरस नष्ट करण्यात यशस्वी होत आहे. या चार अँटीबॉडीज कोरोना विषाणूचा बाह्य काटेरी थराला स्पर्श होताच ते मरतात. त्यामुळे पेशींना चिकटत नाही आता चिनी शास्त्रज्ञांना आशा आहे की, या चार अँटीबॉडीजमुळे ते कोरोना विषाणूचा नाश करण्यासाठी सर्वोत्तम लस तयार करण्यास सक्षम असतील. जर काहीही झाले नाही तर किमान त्यांनी अशी लस तयार केली जेणेकरुन कोरोना विषाणू नष्ट न केल्यास त्याला रोखता येईल म्हणजे प्रतिबंधक लस तयार करण्यात यशस्वी होतील. जर कोरोना विषाणू भविष्यात उत्परिवर्तन करून त्याचे स्वरूप खराब करत असेल तर चार अँटीबॉडीजपैकी एक त्याच्यासह पुढे विकसित होईल म्हणजेच, अँटीबॉडीज विषाणूची जागा घेतील, ते दूर करण्यास देखील मदत करतील. चीनच्या बीजिंग मेडिकल युनिव्हर्सिटी, बीजिंग इंस्टीट्यूट ऑफ लाइफ सायन्ससह चीनमधील सुमारे डझनभर वैज्ञानिक संस्था आणि प्रयोगशाळांमधील वैज्ञानिक या चार अँटीबॉडीज शोधण्यात गुंतले होते. अमेरिकन असोसिएशन फॉर एडव्हान्समेंट ऑफ सायन्स या मासिकामध्ये या चारही अँटीबॉडीज शोधण्याचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. शास्त्रज्ञांनी शोधलेल्या चार अँटीबॉडीजची नावे - बी ३८, एच ४, बी ५ आणि एच २ आहेत. हे चार अँटीबॉडी व्हायरसच्या बाहेरील थरावर असलेल्या एस प्रोटीनला आपल्या शरीरातील पेशींवर टिकू देत नाही. या चार अँटीबॉडीमुळे, व्हायरसचे एस-प्रोटीन संपण्यास सुरुवात होते. आणि काही काळानंतर व्हायरस संपतो. या अँटीबॉडीज कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णाकडून घेतल्या जातात. प्रयोगशाळेत उंदरांवर त्यांचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की, चारही अँटीबॉडीमध्ये कोरोनाला मारण्याची शक्ती आहे. परंतु यापैकी दोन अँटीबॉडीज पूर्णपणे कोरोना विषाणूशी चिकटून राहतात आणि ते नष्ट करण्यास सुरुवात करतात. उर्वरित दोन विषाणूवर हल्ला करतात. या हल्ल्यामुळे कोरोना व्हायरस काहीही करण्यास अक्षम होतो. या रणनीतीमुळे चिनी शास्त्रज्ञांना कोरोना विषाणूचा नाश करण्याचा एक नवीन मार्ग सापडला आहे. जर दोन अँटीबॉडीज कोरोनाच्या बाहेरील थराला चिकटून राहून त्याला संपवतात. तर उर्वरित दोन कोरोनाच्या रासायनिक प्रक्रियेला वाढण्यापासून रोखतात. त्यामुळे कोरोना विषाणू निष्क्रिय होतो. Read in Englishटॅग्स :कोरोना वायरस बातम्याचीनcorona viruschina