CoronaVirus: china is vulnerable to another wave of coronavirus top adviser warns vrd
CoronaVirus: चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार; इम्युनिटी कमी असलेल्या वयोवृद्धांचा धोका वाढणार By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 10:58 AM2020-05-18T10:58:37+5:302020-05-18T11:19:57+5:30Join usJoin usNext कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, अनेक देश अद्यापही त्यावर नियंत्रण मिळवू शकलेले नाहीत. चीनमधून उत्पत्ती झालेल्या कोरोनाच्या संक्रमणाची संभाव्य दुसरी लाट चीनमध्ये येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कोरोनाविरुद्ध लढ्यात चीन सरकारचे वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार झोंग नानशान यांनी शनिवारी सीएनएनला एक मुलाखत दिली. त्या विशेष मुलाखतीतही सांगितले की, डिसेंबरमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची पहिली घटना नोंदवली गेली. तेव्हा त्याच्या गंभीर परिणामांची माहिती दडपण्यात आली. देशाच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या (एनएचसी) आकडेवारीनुसार, चीनमध्ये कोरोना विषाणूचे 82,000 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत, ज्यात किमान 4633 मृत्यू आहेत. जानेवारीच्या उत्तरार्धात कोरोनाचा संसर्ग चीनमध्ये झपाट्याने पसरलं, त्यानंतर वुहान शहर आणि त्याभोवतालचा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आणि प्रवासावर बंदी घालण्यात आली. फेब्रुवारीच्या सुरुवातीस चीनमध्ये एका दिवसात 3,887 कोरोनाचे रुग्ण आढळले. महिन्याभरानंतर त्यात घसरण नोंदवली गेली असून, ते फक्त दुप्पट अंकावर थांबले. 6 मार्च रोजी अमेरिकेत 47 नवीन रुग्ण आढळले आणि महिन्याच्या अखेरीस तेथे 22,562 संक्रमित रुग्ण आढळले. चीनमधील जीवन हळूहळू सामान्य होत आहे. लॉकडाऊननंतर देशभरात काही शाळा व कारखाने सुरू झाले आहेत. मोठ्या प्रमाणात चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती असल्याने चिनी अधिका-यांना आता पूर्णपणे निश्चिंत राहू नये, असे झोंग यांनी सांगितले. अलिकडे वुहान, हेलॉन्गजियांग आणि जिलिन या ईशान्य प्रांतांमध्ये कोरोना विषाणूचे प्रमाण वाढले आहे. चीनमधील बहुतेक नागरिकांना अद्याप कोरोनाच्या संसर्गाचा धोका आहे, कारण त्यांच्यात रोग प्रतिकारशक्ती नाही. आम्ही या गोष्टीचा जोरदार सामना करीत आहोत आणि याबाबतीत अन्य देश आपल्यापेक्षा श्रेष्ठ नाहीत. 2003मध्ये गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम साथीचा सामना करणारे झोंग चीनमध्ये 'सार्स'चे नायक म्हणून ओळखले जातात. कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात त्यांनी देशाचे नेतृत्व केले आणि त्याचा फायदाही झाला.Read in Englishटॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus