Coronavirus: कोणत्याही देशाला जमलं नाही 'ते' चीननं करून 'दाखवलं'; उचललं मोठं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 11:39 AM2020-05-24T11:39:54+5:302020-05-24T11:51:29+5:30

Coronavirus: कोरोनामुळे जगाच्या केंद्रस्थानी आलेल्या चीननं आता कोरोनाविरोधातच मोठं पाऊल उचलल्याचं सांगितलं आहे.

कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवलेला असून, अनेक जण त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोरोनाचं केंद्रबिंदू चीनमधील वुहान असल्याचं अमेरिकेकडून वारंवार सांगितलं जात आहे.

चीन संशयाच्या फेऱ्यात अडकला आहे. अनेक जागतिक स्तरावरचे देश चीनकडे संशयाच्या नजरेनं पाहतात. कोरोनामुळे जगाच्या केंद्रस्थानी आलेल्या चीननं आता कोरोनाविरोधातच मोठं पाऊल उचलल्याचं सांगितलं आहे.

वुहानमध्ये 14.7 लाख कोरोना विषाणू चाचणी घेण्यात आल्याचा दावा चीनने केला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. त्याचबरोबर गुरुवारी 10 लाख लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या.

आतापर्यंत इतर कोणत्याही देशातील एका शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्याची माहिती समोर आलेली नाही.

काही दिवसांपूर्वी चीनने वुहानच्या संपूर्ण लोकसंख्येची कोरोना चाचणी घेण्याचे ठरविले. चिनी अधिका-यांनी यापूर्वी सांगितले होते की, 2 आठवड्यांत त्यांना वुहानच्या 1.1 कोटी लोकसंख्येची चाचणी घ्यायची आहे.

चीनने एका दिवसात वुहानमधील 14.7 लाख लोकांची Nucleic Acid तपासणी केली. 8 एप्रिल रोजी वुहान येथून लॉकडाऊन हटविण्यात आला होता.

लॉकडाऊन काढून टाकल्यानंतर कोरोनाची प्रकरणे पुन्हा उघडकीस येऊ लागली, तेव्हा चीनने 14 मेपासून वुहानमध्ये कोणतीही लक्षणे नसलेल्या लोकांसाठी कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली.

वुहान हे एक असं ठिकाण आहे, जिथून कोरोना विषाणूची उत्पत्ती झाली आणि त्याचा जगभरात संसर्ग सुरू झाला. वुहानमधूनच कोरोना जगभर पसरला.

चीनच्या अधिकृत आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशातील एकूण 84 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4600 लोक मृत्युमुखी पडले आहेत.

. वुहानमध्ये आता परिस्थिती चांगली असल्याचे चीनचे म्हणणे आहे.

जगभरात कोरोना विषाणूची 53,11,089 पेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 3,42,104 लोकांनी आपला जीव गमावला आहे.