CoronaVirus : वैज्ञानिकांचा दावा!; कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या 'या' औषधाने, फक्त 5 दिवसांत कोरोनाचा खात्मा By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 06:24 PM 2020-07-20T18:24:21+5:30 2020-07-20T18:41:20+5:30
कोरोना व्हायरसवरील लस आणि औषधासाठी संपूर्ण जगात संशोधन सुरू आहे. अनेक देशांतील संशोधक यासाठी कंबंर कसून आणि दिवस-रात्र एक करून काम करत आहेत. यामुळे सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे.
आता दोन वैज्ञानिकांनी अभ्यास करून एक मोठा दावा केला आहे. त्यांचे म्हणणे आहे, की कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या औषधाने कोरोना रुग्णांवर उपचार शक्य आहे.
जेरूसलेमच्या हिब्रू विद्यापीठाचे प्राध्यापक याकोव नहमियास आणि न्यूयॉर्क इकाहन स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. बेंजामिन टेनओवर, हे गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनावरील औषधावर संशोधन करत होते. लॅबमध्ये करण्यात आलेल्या या अभ्यासात, कोलेस्टेरॉल कमी करणारे औषध Fenofibrate (Tricor)चा अत्यंत चांगला रिझल्ट आल्याचे समोर आले आहे.
प्राध्यापक नहमियास आणि डॉ. टेनओव्हर यांनी संशोधनादरम्या आपले संपूर्ण लक्ष, कोरोना व्हायरस कशाप्रकारे रुग्णाच्या फुफ्फुसावर परिणाम करतो यावर केंद्रित केले होते.
यात वैज्ञानिकांच्या निदर्शनास आले, की व्हायरस कार्बोहायड्रेटची रुटीन बर्निंग थांबवतो. यामुळे फुफ्फुसाच्या पेशिंमध्ये मोठ्या प्रमाणावर फॅट जमा होते.
डेली मेल आणि medicalxpress.com ने दिलेल्या वृत्तानुसार, या दोन्ही वैज्ञानिकांच्या मते, हाय ब्लड शुगर आणि कोलेस्टेरॉल असणारे कोरोना रुग्ण हाय रिस्क कॅटेगिरीमध्ये का जातात? हे समजण्यास या अभ्यासाची मोठी मदत होऊ शकते.
या संशोधनानुसार, Fenofibrate औषधाच्या वापराने फुफ्फुसातील पेशी अधिक फॅट बर्न करतात. यामुळे कोरोना व्हायरसची शक्ती कमी होते आणि तो स्वतःला रिप्रोड्यूस करू शकत नाही.
लॅबमध्ये करण्यात आलेल्या या संशोधनात, केवळ 5 दिवसांच्या उपचारानंतर व्हायरस नष्ट झाल्याचे समोर आले आहे.