coronavirus: कोरोनावरील लसीच्या नावावर कंपन्यांनी केली नफेखोरी, अनेक बड्या कंपन्यांवर आरोप By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 12:11 PM 2020-07-28T12:11:52+5:30 2020-07-28T12:28:14+5:30
कोरोनावर लवकरात लवकर औषध विकसित करून त्यामाध्यमातून घसघशीत कमाई करण्यासाठी कंपन्यांमध्ये चढाओढ लागली आहे. या परिस्थितीचा फायदा काही औषध निर्माता कंपन्यांचे बौर्ड सदस्य आणि आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या संपूर्ण जग चिंतेत आहे. कोरोनाचा वेगाने होत असलेला संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण यामुळे लोक भयभीत आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाविरोधात विकसित होत असलेल्या औषधाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या परिस्थितीमुळे जगातील अनेक औषध निर्माता कंपन्यांमध्ये कोरोनावरील लस विकसित करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. लवकरात लवकर औषध विकसित करून त्यामाध्यमातून घसघशीत कमाई करण्यासाठी कंपन्यांमध्ये चढाओढ लागली आहे.
दरम्यान, या परिस्थितीचा फायदा काही औषध निर्माता कंपन्यांचे बौर्ड सदस्य आणि आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे. या मंडळींनी नफेखोरीला सुरुवात केली असून, कोरोनावरील लसीबाबत चांगल्या बातम्या पसरवून कोट्यवधींची कमाई करण्यामध्ये गुंतले आहेत.
अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार अशाप्रकारसे काम बहुतांश छोट्या औषध निर्माता कंपन्या करत आहेत. मात्र नफेखोरीच्या या धंद्यात मॉडर्ना, नोवावॅक्स आणि रिजेनेरॉन या सारख्या बड्या कंपन्यादेखील सामील असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
न्यूयॉर्क टाइम्ससाठी माहितीचे संकलन करणाऱ्या इक्विलार या कंपनीच्या म्हणण्यानुसार कमीत कमी ११ कंपन्यांनी मार्च महिन्यानंतर शेअरची विक्री करून सुमारे ७ हजार ५०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
अनेक प्रकरणात कंपन्यांशी संबंधित लोकच कंपनीकडून नियमितपणे मिळणारे शेअर आमि ऑटोमॅटिक ट्रेंडिंगमधून नफा कमवत आहेत. दोन्ही बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेअरचे मूल्य वाढल्याच्या संधीचा लाभ उठवला आहे.
काही कंपन्यांनी कोरोनावरील लसीच्या प्रगतीबाबत बाजारावर प्रभाव पाडणारी घोषणा करण्यापूर्वी काही काळ आधी अधिका्ऱ्यांना शेअरचे वाटप केले आहे. कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना औषधाबाबत चांगल्या हेडलाइन्स मिळवल्याची बक्षिसी देण्यात आली आहे. मात्र मात्र औषध येण्याबाबत कुठलीह गॅरंटी अद्याप नाही.
काही कंपन्यांनी आपल्या मार्केटिंगसाठी सरकारच्या वॅक्सिन अभियान वार्प स्पीडसोबत आपण जोडले गेले असल्याचा दावा केला आहे. आथा सरकार या दाव्यांचा तपास करत आहे. वेक्सार्ट कंपनीने कोरोनावरील औषधाला सरकारी मोहीम वार्प स्पीडसाठी निवडण्यात आल्याचा दावा केला होता.
मात्र वेक्सार्टचे औषध माकडांवरील चाचणीसाठी वापरण्यात आले आहे. ज्या कंपन्यांना लस विकसित करण्यासाठी सरकारकडून पैसे मिळाले आहेत. त्यामध्ये वेक्सार्ट कंपनीचा समावेश करण्यात आलेला नाही
आता अमेरिकन सरकारने अशा कंपन्यांची नावे सिक्योरिटीज आणि एक्सचेंज कमिशनला दिली आहे. कोरोना विषाणूवरील लस आणि इलाजावरील संशोधनामधून मोठ्या प्रमाणात फायदा करून घेणाऱ्या कंपन्यांची यादी खूप लांब आहे.
आरोग्य विभागाच्या मदतीच्या घोषणेनंतर बायोटेक कंपनी रीजेनेरॉनचे शेअर फेब्रुवारी महिन्यात ८० टक्क्यांनी वाढले होते. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे पाच हजार २०० कोटी रुपयांचे शेअर विकूनू टाकले. यामध्ये कंपनीचे सीईओ लिओनार्ड स्कीलफर यांनी एका दिवसात १३३० कोटी रुपयांचे शएअर विकले होते.
१० वर्षांपासून लस विकसित करण्याच्या क्षेत्रात असलेली कंपनी मॉडर्ना हिने जानेवारीमध्ये कोरोनावरील लस विकसित करण्याबाबत काम सुरू करण्याची घोषणा केली होती. यादरम्यान या कंपनीने लस विकसित करण्याबाबत विविध प्रकारची माहिती दिली. त्यामुळे या कंपन्यांच्या शेअरचे मूल्या तिप्पटीने वाढले आहे. तसेच त्याचे बाजारमूल्य २.२४ लाख कोटी झाले आहे. दरम्यान, मॉडर्नाशी संबंधित लोकांना १८५ कोटी रुपयांचे शेअर विक्री केले आहे.