Coronavirus: लस घेतलेल्यांवर साऊथ आफ्रिकी कोरोना स्ट्रेनचा हल्ला; इस्राईल रिपोर्टचा खळबळजनक दावा By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 10:15 AM 2021-04-14T10:15:29+5:30 2021-04-14T10:20:10+5:30
Coronavirus Vaccination: जगभरात कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली असून अनेक जण यात बाधित होत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक लसी उपलब्ध झाल्यात. परंतु काहींना लस घेतल्यानंतरही कोरोना होत असल्याचं आढळून येत आहे. इस्राईलच्या वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासानुसार असं म्हटलं आहे की ज्यांनी लस घेतली आहे त्यांना दक्षिण-आफ्रिकेतील कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका ज्यांनी लस घेतली नाही यांच्या तुलनेत आठ पट वाढू शकतो. या दाव्यामुळे जगभरात खळबळ माजली आहे.
परंतु भारतातील प्रमुख संसर्ग तज्ज्ञांपैकी एक डॉ. गगनदीप कांग यांचे म्हणणे आहे की, ही स्थिती इतकी भयंकर नाही जितकी रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. इस्त्रायली रिपोर्टमध्ये लसीकरण झालेल्या व्यक्तींचा समावेश केला आहे.
मग त्यांची तुलना संक्रमित लोकांशी केली ज्यांनी लस घेतली नाही. बहुतेक लोकांना कोरोना विषाणूच्या यूके व्हेरिएंट बी.1.1.7 मध्ये संसर्ग झाला होता. या अभ्यासात असे दिसून आले आहे की, ज्यांनी कोरोना लसीचा एक डोस घेतला होता किंवा दुसऱ्या डोससाठी एका आठवड्यापेक्षा कमी वेळ होता, ते या व्हेरिएंटच्या जाळ्यात अडकले.
परंतु दक्षिण आफ्रिकेतील व्हेरिएंट बी 1.351 ने अशा आठ लोकांना संसर्ग झाला, येथे एकाने लस घेतली नव्हती तो संक्रमित आढळला. म्हणजेच, दक्षिण आफ्रिकेच्या कोरोना प्रकाराचा संसर्ग लस घेतलेले आणि लस न घेतलेले यांचे प्रमाण 8:1 अशं आहे
यावरून, असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की, लस घेतलेल्या लोकांवर दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाचा प्रकार बी 1.351 वर परिणामकारक नाही. परंतु १४ दिवसांपूर्वी लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या कोणालाही संसर्ग आढळला नाही हे सत्य आहे.
याचा अर्थ असा आहे की, लसीच्या पहिल्या डोसच्या दोन आठवड्यांनंतर, दुसरा डोस घेतल्यानंतर एक आठवड्यांच्या आत लोकांवर दक्षिण आफ्रिकी कोरोनाचा प्रार्दुभाव होतो. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवसांच्या कालावधीनंतर हा व्हायरस त्या लोकांना संक्रमित करू शकत नाही.
डॉ. कांग म्हणाले की, इस्त्रायली शास्त्रज्ञांच्या दाव्यांची चाचणी घेण्याची गरज आहे. इस्त्राईलमधील हा अभ्यास केवळ फायझर(Pfizer Vaccine) लसीवर झाला होता. अशा परिस्थितीत दुसर्या लसीबाबतही हाच दावा खरा आहे की नाही असा प्रश्न पडतो.
या प्रश्नावर डॉ. कांग सांगतात की, स्पाइक प्रोटीनवर आधारित सर्व लसींमध्ये अशी समस्या उद्भवू शकते. आपल्याला जगभरातील लसीच्या परिणामाचा अभ्यास केला पाहिजे. फायझर लस भारतात वापरली जात नसल्यामुळे किंवा दक्षिण आफ्रिकेच्या कोरोना प्रकारचे जास्त रुग्ण आढळत नसल्यामुळे इस्त्रायली अभ्यासाबद्दल चिंता व्यक्त करण्याची गरज नाही.
मूलभूत प्रश्न आहे की, कोरोना विषाणूच्या भिन्न प्रकारांबद्दल आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या लसींच्या प्रभावाबद्दल आहे. फायझर लसीच्या परिणामाचा अभ्यास इस्राईलमध्ये झाला आहे. इतर लसींच्या प्रभावांचा अभ्यास केल्यास आपण कोणत्या लसीसाठी अधिक कार्यक्षम आहे याची कल्पना येऊ शकते. इस्त्रायली अभ्यासाच्या निकालांबद्दल काळजी करण्याची गरज नाही, परंतु आपण तयारी केली पाहिजे.
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल 13 कोटींच्या पुढे गेली असून लाखो लोकांना यामुळे जीव गमावला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 1,84,372 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,027 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.