Coronavirus: कोरोना व्हायरसनं 'या' १५ देशांचं चित्रच पालटलं; काय झालं बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 06:09 PM2020-03-25T18:09:21+5:302020-03-25T18:24:53+5:30

जगभरात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. चीनमध्ये केंद्रबिंदू असलेल्या या व्हायरसनं अख्ख्या जगाला विळखा घातला आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तसेच आंतरराष्ट्रीय विमानंही रद्द करण्यात आली आहेत. कोरोना विषाणूची एवढी दहशत पसरली आहे की लोकांनी घराबाहेर पडणंच सोडून दिलं आहे. विशेष म्हणजे काही गजबजलेली ठिकाणंही निर्मनुष्य झाली आहेत. कायम लोकांची वर्दळ असणारी ठिकाणी ओस पडल्याचं चित्र आहे.

Czech Republicमधला 5 मार्चला झालेला Biathlon World Cupसुद्धा दर्शकांशिवाय संपन्न झाला आहे.

पॅरिसमधलं Louvreचं चित्रसुद्धा निराश करणारं आहे.

कोरोनापायी बर्लिनचा The International Tourism Exchange रद्द करण्यात आलं आहे.

Baliचं The Ngurah Rai International Airportवरही शुकशुकाट आहे.

इराणमधल्या शॉपिंग सेंटरचा फोटो कोरोनाची ही दहशत आहे, हे सिद्ध करतो.

इराकची Najaf मशिदीचं असं चित्र क्वचितच पाहायला मिळेल

Milanच्या The Piazza Duomoमध्ये माणसांऐवजी पक्षी पाहायला मिळत आहेत.

कोरोना व्हायरसच्या प्रकोपाच्या कारणास्तव ६ मार्च २०२०ला जपान आणि इक्वाडोरमध्ये डेव्हिस कप बंद दरवाज्यांत खेळला गेला.

Beirutमध्ये चर्चची साफसफाई करण्यात येत आहे.