Coronavirus : कोरोनामुळे या देशांमध्ये झाले सर्वाधिक मृत्यू, पाच लाखांहून अधिक मृत्यूंसह भारत तिसऱ्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 04:43 PM2022-02-09T16:43:03+5:302022-02-09T16:54:26+5:30

Coronavirus Death: चीनमधील वुहान शहरातून फैलावण्यास सुरुवात झालेल्या कोराना विषाणूने गेल्या २६ महिन्यांमध्ये जगभरात ५७.४ लाख लोकांचा बळी घेतला आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेले पहिले दहा देश पुढीलप्रमाणे आहे.

चीनमधील वुहान शहरातून फैलावण्यास सुरुवात झालेल्या कोराना विषाणूने गेल्या २६ महिन्यांमध्ये जगभरात ५७.४ लाख लोकांचा बळी घेतला आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेले पहिले दहा देश पुढीलप्रमाणे आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेमध्ये कोरोनामुळे ९ लाख २४ हजार ५३० जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्राझीलमध्ये कोरोनामुळे ६ लाख ३१ हजार ६९ जणांचा मृत्यू झालाय. कोरोनाबळींच्या यादीत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतामध्ये कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे पाच लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या यादीत भारत तिसऱ्या स्थानी आहे.

रशियामध्ये कोरोनामुळे ३ लाख ३४ हजार ७५३ जणांचा मृत्यू झाला आहे. या यादीत रशिया चौथ्या क्रमांकावर आहे.

कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत मेक्सिको पाचव्या क्रमांकावर आहे. मेक्सिकोमध्ये कोरोनामुळे ३ लाख ८ हजार ८२९ जणांचा मृत्यू झाला आहे.

पेरूमध्ये कोरोनामुळ २ लाख ६ हजार ६४६ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक कोरोनाबळी गेलेल्या देशांमध्ये पेरू सहाव्या स्थानी आहे.

कोरोनाची सर्वाधिक झळ बसलेल्या युनायटेड किंग्डममध्ये कोरोनामुळे १ लाख ५७ हजार ९८४ जणांचा बली गेला. सर्वाधिक कोरोना मृत्यूंमध्ये युनायटेड किंग्डमचा सातवा क्रमांक लागतो.

इटलीमध्ये कोरोनामुळे १ लाख ४८ हजार १६७ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक कोरोनाबळींच्या क्रमवारीत इटली आठव्या स्थानी आहे.

सर्वाधिक कोरोनाबळींच्या यादीत इंडोनेशिया नवव्या क्रमांकावर आहे. या देशात कोरोनामुळे १ लाख ४४ हजार ४५३ जणांचा मृत्यू झाला आहे.

इराणमध्ये कोरोनामुळे १ लाख ३२ हजार ६८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोनाबळी गेलेल्या देशामध्ये इराण हा दहाव्या स्थानी आहे.