Coronavirus: अमेरिकेसाठी कठीण आठवडा, कोरोनाग्रस्त मृतांचा आकडा १०,००० पार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 01:57 PM2020-04-07T13:57:40+5:302020-04-07T14:09:00+5:30

It's critical that states share detailed information about medical supply usage so that we can distribute these materials when and where they are most needed - donald trump. amrica death toll of coronavirus 10 thousand

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. अमेरिकेसारख्या महासत्ता देशासह अनेक जगभरातील देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. बहुतांश देशांमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे.

अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ११५० लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १०००० लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

जॉन्स हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत ३,६६००० लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये गेल्या २४ तासांत ३०००० कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत अमेरिकेत १०७८३ लोकांचा मृत्यू झाला आहे

अमेरिकेतील न्यूयॉर्क हे शहर कोरोनाचे केंद्रबिंदू बनले आहे, या शहरात आत्तापर्यंत ४७५८ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

जगभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत ७४००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जवळपास ५०००० लोकांचा मृत्यू युरोपीयन देशांमध्ये झाला आहे.

अमेरिकेकडून सांगण्यात येत आहे की, १ लाखांपेक्षा कमी मृत्यु कोरोनामुळे होतील. १ लाखांच्या आता कोरोनाचे मृत्यू रोखण्यात अमेरिका यशस्वी ठरेल.

अमेरिकेसाठी सध्याचा आठवडा अतिशय महत्वाचा असून हा कठिण काळ आहे. या आठवड्यानंतर पुन्हा चांगली पहाट उजाडेल, अशी आशा अमेरिकेला आहे.

भारतात सुद्धा कोरोनोमुळे चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ३५४ नवीन रुग्ण आढळले आहेत.

गेल्या २४ तासांत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत ४४२१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

अमेरिकेतील एका जोडप्याचा हा फोटो खूप काही सांगून जातोय. कोरोनाची भीती अन् कहर या दोघांच्या चेहऱ्यावरील भाव सर्वकाही सांगतोय