Coronavirus: Due using of BCG vaccine Corona death rate lower in country pnm
Coronavirus:…म्हणून भारतात कोरोना व्हायरसचा धोका कमी; अभ्यास अहवालातून लोकांना मोठा दिलासा By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 04:39 PM2020-04-08T16:39:35+5:302020-04-08T16:45:27+5:30Join usJoin usNext कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सर्व संशोधन केले जात आहे. अमेरिकन संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार असा दावा करण्यात आला आहे की ज्या देशांमध्ये बीसीजी (बॅसिलस कॅलमेट गुएरिन) लस मोठ्या प्रमाणात वापरली जाते, त्या देशात मृत्युदर इतर देशांपेक्षा सहा पटीने कमी आहे. जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या तज्ज्ञांनी हा अभ्यास केला आहे. यातील काही निष्कर्ष साइट मेडरिक्सिववर प्रकाशित केले गेले आहेत. हे आरोग्य तज्ञांच्या आढावा घेतल्यानंतर मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित केले जाईल. बीसीजी लस टीबी (क्षयरोग) विरूद्ध रोग प्रतिकारशक्ती विकसित करते. टीबी हा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतो. डेली मेलच्या अहवालानुसार, ज्या लोकांना बीसीजीवर लसी देण्यात आली आहे त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत आहे आणि ते इतरांपेक्षा स्वत:ला संसर्गापासून संरक्षण करण्यास सक्षम आहेत असं अभ्यासात सिद्ध झालं आहे. उदाहरणार्थ, अमेरिकन लोकांवर केलेल्या चाचणीत असं आढळले आहे की बालपणी दिलेली बीसीजी लस 60 वर्ष टीबीपासून संरक्षण करते. ही लस इतर संक्रमणापासून किती संरक्षण देते हे सांगणे कठीण आहे, परंतु अंतर्गत प्रतिकारशक्ती लसीमुळे जास्त चांगले कार्य करत असेल हे होऊ शकतं. बीसीजीचा वापर भारत आणि आफ्रिकन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात केला गेला आहे. या अभ्यासाच्या निष्कर्षाची वैज्ञानिकांनी पुष्टी केल्यास ही भारतासाठी चांगली बातमी ठरेल. बीसीजी लस कोरोनाकडून मृत्यूचे प्रमाण कमी करते असे म्हणतात, परंतु यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी होणार नाही. ब्रिटनमध्ये 1953 ते 2005 या काळात शालेय मुलांना ही लस देण्यात आली. टीबीची प्रकरणे कमी झाल्यावर डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणात लस देणे बंद केले. २००५ मध्ये, ही लस केवळ अत्यंत गंभीर धोक्याच्या बाबतीत दिली जाऊ लागली. बीसीजी लस रोगप्रतिकारक प्रणालीवर काम करेल आणि कोरोना विषाणूचा शरीरात आक्रमण होण्यापासून वाचवेल अशी अपेक्षा संशोधकांना आहे. देशातील संपन्नता आणि लोकसंख्येमधील वृद्धांची संख्या यासारख्या घटकांचा देखील या अभ्यासात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय एका देशातील 10 लाख लोकांवर मृत्यू दर किती आहे याचाही अभ्यास केला आहे. कोणत्याही देशाची आर्थिक स्थिती, वृद्ध लोकसंख्येचे प्रमाण आणि सर्व अभ्यासांमध्ये मृत्यूचे प्रमाण यासह घटकांचा समावेश असूनही बीसीजी लस आणि कमी मृत्यू दरामधील संबंध नाकारता येत नाही असे अमेरिकन संशोधकांनी या पत्रकात लिहिले आहे. देशांच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीबरोबरच कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूदरातही फरक आढळला. कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये मृत्यूचे प्रमाण १० लाख लोकांमध्ये ०.४ टक्के, मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ०.६५ टक्के आणि उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ५.५ टक्के असल्याचे दिसून आले. म्हणजेच, विकसित देशांमध्ये कोरोना संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की कोविड -१९ हे 65 किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी अधिक धोकादायक आहे, तर गरीब देशातील बहुसंख्य लोकसंख्या तरुण आहे. बीसीजी लस आणि आर्थिक स्थितीशी कोरोना विषाणूचे संबंध लक्षात घेतले पाहिजे. जगात अशा अनेक चाचण्या चालू आहेत ज्यात कोरोना विषाणूंविरूद्ध लढा देण्यासाठी बीसीजी लसीच्या भूमिकेचा शोध घेण्यात येत आहे. अशीच एक चाचणी ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या महिन्यात 4000 आरोग्यसेवकांवर सुरू झाली आहे. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus