CoronaVirus eating wild animals banned in Wuhan as China goes defensive kkg
CoronaVirus News: अखेर जगाच्या दबावापुढे चीन झुकला; वुहानमध्ये मोठा निर्णय घेतला By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 06:05 PM2020-05-21T18:05:41+5:302020-05-21T18:13:46+5:30Join usJoin usNext चीनच्या वुहान प्रांतातून जगभरात कोरोना विषाणू पसरला. जगात आतापर्यंत ५० लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून मृतांचा आकडा तीन लाखांच्या पुढे गेला आहे. कोरोनाचा विषाणू नेमका कसा पसरला, याबद्दलची ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र कोरोनाच्या मांस बाजारातून हा विषाणू पसरल्याची दाट शक्यता वर्तवली जाते. कोरोनाची पहिली रुग्ण वुहानच्या बाजारात मांस विक्री करणारी एक महिला होती. वुहानमधल्या या मांस विक्री बाजाराबद्दल सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. वुहानच्या बाजारात वन्य प्राण्यांचं मांस विकलं जातं. इथूनच कोरोना पसरल्याचा दाट संशय जगभरातून व्यक्त होत आहे. त्यामुळे वुहानमधला मांस बाजार बंद करण्यात यावा, अशी मागणी जगभरातून केली जात होती. अखेर वुहान सरकारनं मांस बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी नोटीस प्रशासनानं काढली असून पुढील पाच वर्षांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्लोबल टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार वुहान सरकारनं त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर याबद्दलची माहिती दिली आहे. वुहानमध्ये वन्य प्राण्यांच्या शिकारीवर आणि त्यांच्या मांसाची विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. वन्य प्राणी आणि त्यांच्यापासून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या विक्रीवर वुहान सरकारनं निर्बंध आणले आहेत. हुबेई प्रांतातल्या संरक्षण यादीत असणाऱ्या सर्व प्राण्यांचा यामध्ये समावेश आहे. दुर्मिळ प्राण्यांचादेखील यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे वुहानमध्ये पुढील पाच वर्षे कोल्हा, मगर, लांडगा, साप, उंदीर, मोरांच्या मांसाची विक्री करण्यात येणार नाही. कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला वन्यजीव किंवा त्याच्याशी संबंधित वस्तूंचं उत्पादन करता येणार नाही. याशिवाय मांसावर प्रक्रियादेखील करता येणार नाही.Read in Englishटॅग्स :कोरोना वायरस बातम्याचीनcorona viruschina