Coronavirus: ही दोस्ती तुटायची नाय! कोरोनावरील लस सर्वप्रथम अमेरिकेलाच देणार; ‘या’ कंपनीची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 15:42 IST2020-05-14T15:34:19+5:302020-05-14T15:42:21+5:30

फ्रान्सची औषध निर्माण कंपनी सैनोफी यांनी म्हटलं आहे की त्यांनी बनवलेली पहिली लस ते अमेरिकेला देतील. काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची या कंपनीत भागीदारी असल्याची बातमी आली होती. ट्रम्प यांनी त्यात गुंतवणूक केली आहे. कदाचित हेच कारण आहे की सैनोफीने सर्वप्रथम अमेरिकेला आपली कोरोना लस देण्याची तयारी केली आहे.
सैनोफी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल हडसन यांनी ब्लूमबर्ग न्यूजला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले की, अमेरिकेने कंपनीमध्ये बरीच गुंतवणूक केली आहे. म्हणूनच आमच्या कंपनीने बनविलेली पहिली कोरोना लस घेण्याचा त्यांचा हक्क आहे.
तसेच या प्रकरणात युरोप मागे पडत असल्याचे पॉल हडसन यांनी इशारा दिला. युरोपमध्ये गोष्टी फार वाईट आहेत. अमेरिकेने फेब्रुवारीमध्येच सैनोफीमध्ये जास्त गुंतवणूक केली. तसेच कंपनीच्या लसीसाठी प्री-ऑर्डरही देण्यात आली आहे.
सैनोफी ही सध्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असून कोरोना लसीसाठी काम करत आहे. सैनोफीने अमेरिकेच्या सांगण्यावरून प्रतिस्पर्धी ग्लॅक्सोस्मिथक्लिनबरोबर करार केला आहे. जेणेकरुन दोन्ही कंपन्या एकत्रितपणे एका वर्षात ६०० कोटी लस तयार करु शकतील.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने यावेळी ऑपरेशन वार्प वेगात सुरु केला आहे. ज्या अंतर्गत कोरोना लस संशोधन करण्यासाठी अमेरिका अनेक औषध कंपन्यांना वित्तपुरवठा करीत आहे. प्रत्येक प्रकारे मदत देण्याचं सुरु आहे.
अमेरिकेच्या बायोमेडिकल एडव्हान्स रिसर्च अँण्ड डेव्हलपमेंट अँथॉरिटीने (बार्डा) सैनोफीला कोरोना लसीवर काम करण्यासाठी ३० मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे २२६ कोटी रुपये दिले आहेत.
सैनोफीबरोबर बार्डाचे खूप जुने नाते आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अमेरिकेने सैनोफी इन्फ्लूएन्झाची लस विकसित करण्यासाठी २२६ मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे १७०५ कोटी रुपये दिले.
काही दिवसांपूर्वी अमेरिकन वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाईम्स’ च्या संकेतस्थळावर हे उघड झाले होतं की डोनाल्ड ट्रम्प हे मलेरियावरील औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्वीच्या मागे का आहेत. यात डोनाल्ड ट्रम्प यांचा वैयक्तिक फायदा असल्याचे मीडिया इन्स्टिट्यूटने म्हटलं होतं.
वेबसाइटवर असे लिहिले आहे की फ्रान्स औषधनिर्माण कंपनी सैनोफीवर डोनाल्ड ट्रम्प यांचा वैयक्तिक फायदा आहे. ट्रम्प यांचेही कंपनीत समभाग आहेत. ही कंपनी प्लाकेनिल या ब्रँड नावाने बाजारात हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध विकते
तथापि, हे औषध अँटी-मलेरिया औषध क्लोरोक्विनपेक्षा थोडेसे वेगळे आहे. ही एक टॅबलेट आहे ज्याचा वापर ऑटोइम्यून रोगांच्या उपचारांमध्ये केला जातो. परंतु कोरोना रोखण्यासाठी देखील याचा उपयोग केला गेला आहे.
न्यूयॉर्क टाईम्सच्या मते, जर हायड्रॉक्सीक्लोरोक्विनला जगभरात कोरोनाचा उपचार करण्याची परवानगी दिली गेली तर ही औषधे बनविणाऱ्या कंपन्यांना मोठा फायदा होईल. अशाच एका कंपनीत डोनाल्ड ट्रम्प यांचे शेअर्स आहेत. तसेच, डोनाल्ड ट्रम्प यांचे त्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सखोल संबंध आहेत.
सार्स-सीओव्ही -2 वर या औषधाचा विशेष प्रभाव आहे. हाच विषाणू आहे ज्यामुळे कोविड -2 होतो. आणि म्हणूनच कोरोना विषाणूच्या रुग्णांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या दिल्या जात आहेत.
मलेरियासारख्या धोकादायक आजारांशी लढण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन एक प्रभावी औषध आहे. दरवर्षी भारतात मोठ्या प्रमाणात लोक मलेरियामुळे बळी पडतात. म्हणूनच भारतीय औषध कंपन्या मोठ्या प्रमाणात त्याचे उत्पादन करतात.