धक्कादायक! नाकातून सॅम्पल घेण्याच्या वापरलेल्या कीट धुवून पुन्हा विकल्या, ९ हजार लोक झाले शिकार...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 02:14 PM2021-05-05T14:14:33+5:302021-05-05T14:26:17+5:30

Indonesia : पोलिसांनुसार, मेडन एअरपोर्टवर कमीत कमी ९ हजार लोक या फसवणुकीचे शिकार झालेत. बीबीसीच्या वृत्तानुसार, सरकारी कंपनी किमिया फार्मा विरोधात फसवणुकीचा शिकार झालेल्या प्रवाशांनी केस केली आहे.

एकीकडे जग कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीमुळे हैराण आहे. तर दुसरीकडे काही लोक असेही आहेत जे या संकटकाळातही घोटाळे करत आहेत. त्यांच्या पैशांच्या लालसेसमोर माणसाच्या जीवालाही काही किंमत नाही.

इंडोनेशियातून (Indonesia) एक अशीच खळबळजनक घटना समोर आली आहे. एका औषध कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांनी लोकांच्या जीवाशी खेळ केला. त्यांनी नाकातून सॅम्पल घेण्यासाठी वापरली कीट एकदा वापरल्यावर पुन्हा धुवून वापरल्या (Firm busted for reusing covid nasal swab test Antigen Rapid Test) आहेत.

पोलिसांनुसार, मेडन एअरपोर्टवर कमीत कमी ९ हजार लोक या फसवणुकीचे शिकार झालेत. बीबीसीच्या वृत्तानुसार, सरकारी कंपनी किमिया फार्मा विरोधात फसवणुकीचा शिकार झालेल्या प्रवाशांनी केस केली आहे.

वैश्विक महामारीदरम्यान नाकातून स्वॅब घेऊन टेस्ट करणं भारतासहीत अनेक देशात सामान्य आहे. पोलिसांनी सांगितले की, हा घोटाळा गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये उत्तर सुमात्रा कुआलानामू एअरपोर्टवर झाला. मात्र, हे स्पष्ट होऊ शकलं नाही की, याचा घोटाळ्याचा खुलासा कसा झाला.

इंडोनेशियामध्ये विमान प्रवास करण्यासाठी कोविड निगेटिव्ह रिपोर्ट गरजेचा आहे. त्यामुळे एअरपोर्टवर टेस्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. एअरपोर्ट प्रशासन या टेस्ट किमिया फार्मा द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या एंजीजन रॅपिड टेस्ट कीटचा वापर करून करत होते.

गेल्या आठवड्यात मॅनेजरसहीत कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. यांच्यावर संशय आहे की, त्यांनी आरोग्य आणि उपभोक्ता कायद्याचं उल्लंघन केलं. नाकातून सॅम्पल घेण्याच्या स्टिकचा एकदा वापर केल्यावर पुन्हा त्या धुवून पॅक करून विकल्या.

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, या प्रकरणात २३ लोकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी केस दाखल केली आहे. तसेच तपासही सुरू केला आहे. असे मानले जात आहे की, या लोकांनी या घोटाळ्यातून साधारण ९२ लाख रूपये नफा कमावला.

याचाही शोध घेतला जात आहे की, यातून मिळालेल्या पैशातून एका कर्मचाऱ्याने आलिशान घर बांधलं. किमिया फार्माचं मुख्यालय जकार्तामध्ये आहे. कंपनीने सर्वच आरोपींना कामाहून काढलंय.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, काही प्रवाशी कंपनी विरोधात केस ठोकण्याच्या तयारीत आहेत. सामूहिक केसमध्ये प्रत्येक प्रवाशाला १०० कोटी इंडोनेशियाई रूपये नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.

Read in English