CoronaVirus: बापरे! चार आठवड्यांत ३० देशांत पसरला; डेल्टा पेक्षाही खतरनाक Lambda Variant ची दस्तक By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 09:52 AM 2021-07-07T09:52:34+5:30 2021-07-07T09:57:38+5:30
Lambda Variant more dangerous than Delta corona variant: गेल्या चार आठवड्यांत या व्हेरिअंटने तीस देशांत हातपाय पसरले आहेत. हा व्हेरिअंट पेरू देशात पहिल्यांदा सापडला होता. आता हा Lambda व्हेरिअंट जगातली वेगवेगळ्या देशांमध्ये वेगाने पसरू लागला आहे. लंडन : कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटची धास्ती अद्याप संपत नाही तोच आता नव्या व्हेरिअंटने धुमाकूळ घालण्यास सुरुवात झाली आहे. लॅम्बडा व्हेरिअंटने (Lambda Variant) तीस देशांत हजेरी लावली असून डेल्टापेक्षाही जास्त खतरनाक असल्याचे युकेच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. (lambda variant of the coronavirus is turning out to be deadlier than Delta, which was first discovered in India.)
गेल्या चार आठवड्यांत या व्हेरिअंटने तीस देशांत हातपाय पसरले आहेत. हा व्हेरिअंट पेरू देशात पहिल्यांदा सापडला होता. आता हा Lambda व्हेरिअंट जगातली वेगवेगळ्या देशांमध्ये वेगाने पसरू लागला आहे. (Lambda variant: All you need to know about new strain of COVID-19 detected in UK)
या व्हेरिअंटमुळे ब्रिटनसह अनेक देशांमध्ये रुग्णवाढ होऊ लागली आहे. युकेमध्ये आतापर्यंत सहा रुग्ण सापडले आहेत.
हा लॅम्बडा व्हेरिअंट डेल्टापेक्षा जास्त संक्रमक असल्याने संशोधकांची चिंता वाढली आहे. पहिला रुग्ण पेरुमध्ये आढळला. या व्हेरिअंटला C.37 स्ट्रेन या नावाने ओळखले जाते.
युरो न्यूजने पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन (पीएएचओ) च्या हवाल्यानुसार सांगितले की, पेरुमध्ये मे आणि जूनमध्ये कोरोना रुग्णांची सॅम्पल घेण्यात आली होती.
यापैकी जवळपास ८२ टक्के सॅम्पलमध्ये Lambda Variant सापडला आहे. पेरुमध्येच Lambda Variant चे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.
डेल्टा व्हेरिअंटने आता देखील भारतासह जगभरात पाय रोवले आहेत. चिंतेची बाब म्हणजे कोरोना लस डेल्टावर किती परिणामकारक आहे यावर वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.
नुकताच इस्त्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने फायझर लसीच्या कोरोनावरील परिणाम घटल्याचे म्हटले होते. हा प्रभाव ६४ टक्के झाल्याचे म्हटले होते. इस्त्रायलमध्ये डेल्टा व्हेरिअंट पसरल्यानंतर ही माहिती देण्यात आली होती.
वृत्तसंस्था शिन्हुआने मंत्रालयाच्या हवाल्याने सांगितले की, नवीन आकडा ६ जून ते ३ जुलैच्या काळातील आहे. २ मे ते ५ जून या काळात याच लसीचा प्रभाव हा 94.3% होता.
याचवेळी Lambda Variant आल्याने जगाच्या चिंतेत भर पडली आहे. या व्हेरिअंटमध्ये असामान्य पद्धतीचे म्युटेशन झालेले आहे.