CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटचा कहर; एका दिवसात 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 03:36 PM 2021-08-18T15:36:26+5:30 2021-08-18T15:49:51+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. संपूर्ण जग कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असं असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 20 कोटींचा टप्पा पार केला आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे.
अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे.
मंगळवारी एका दिवसात 1000 हून अधिक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत एका तासात 42 जणांचा मृत्यू होत आहे. डेल्टा व्हेरिएंटने थैमान घातले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. एप्रिलनंतर आता मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत 6.23 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाने चिंता वाढवली असून संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. तसेच जगभरात युद्धपातळीवर संशोधन देखील सुरू आहे. कोरोनामुळे अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. मात्र याच दरम्यान कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस सारख्या व्हेरिएंटनी चिंता वाढवली आहे. व्हायरसच्या रुपात सातत्याने बदल होत असलेले पाहायला मिळत आहेत.
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेदरम्यान उद्भवलेला डेल्टा व्हेरिएंट सर्वाधिक घातक असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. पण डेल्टाहूनही अधिक जीवघेणा व्हायरस येऊ शकतो का? याबाबत तज्ज्ञ सध्या संशोधन करत आहेत.
या व्हेरिएंटबाबत अद्याप पूर्णपणे संशोधन झालेलं नाही. पण हा व्हायरस सध्या जगातील 135 देशांमध्ये पसरला असून जगाची चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट इतर व्हेरिएंच्या तुलनेत सर्वाधिक संसर्गजन्य आणि घातक असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णामध्ये याची लक्षणं कमी वेळात दिसून येत आहेत. तसेच डेल्टा व्हेरिएंटमुळे अन्य आजारांना देखील आमंत्रण मिळत आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेले नागरिकदेखील डेल्टा व्हेरिएंटच्या विळख्यात सापडत आहेत. हा व्हायरस लसीकरणामुळे मानवी शरिरात तयार झालेल्या रोगप्रतिकार शक्तीला सहजपण चकमा देऊ शकतो.
चीनी संशोधकाच्या मते डेल्टा व्हायरस हा कोरोना व्हायरसच्या मुळ रुपाच्या तुलनेत तब्बल 1260 पट अधिक संसर्गजन्य आहे. काही अमेरिकन संशोधकांच्या मते, लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही डेल्टाची लागण झाली आहे.
लस न घेतलेल्या नागरिकांमध्ये जितका व्हायरल लोड आहे, तितकाच 'व्हायरल लोड' लस घेतलेल्या नागरिकांमध्ये आढळला. यावर अद्याप संशोधन पूर्ण झालं नाही. शास्त्रज्ञांच्या मते, डेल्टा व्हेरिएंटमध्येही बदल होणं शक्य आहे. कारण डेल्टा प्लस हा व्हेरिएंटदेखील डेल्टापासून तयार झाला आहे.
येत्या काळात डेल्हा व्हेरिएंटहून अधिक जीवघेणा व्हेरिएंट येण्याची शक्यता आहे. व्यापक प्रमाणात लसीकरण केल्यानं मृत्यूदर कमी केला जाऊ शकतोस असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं आहे.