CoronaVirus Live Updates : अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा विस्फोट! एका दिवसात 1 लाख नवे रुग्ण; डेल्टा व्हेरिएंटने वाढवली चिंता By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 09:36 AM 2021-07-28T09:36:10+5:30 2021-07-28T09:44:51+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असं असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे.
कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 19 कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या 195,990,126 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 4,193,155 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.
अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटीचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेत आता पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला आहे.
एका दिवसात कोरोनाचे तब्बल 1 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. डेल्टा व्हेरिएंटने चिंता वाढली आहे. पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठा वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे.
कोरोनाने रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. अधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याबाबतचे नवीन नियम तयार केले आहेत. गेल्या आढवड्याच्या तुलनेत ही रुग्णसंख्या चिंताजनक आहे.
सर्वाधिक रुग्णसंख्या ही फ्लोरिडा (38,321), टेक्सास (8,642), कॅलिफोर्निया (7,731), लुइसियाना (6,818), जॉर्जिया (3,587), यूटाह (2,882), अलबामा (2,667), आणि मिसॉरी (2,414) मध्ये आहे. सध्या 40,000 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अमेरिकेत कोरोनाचा सर्वात जास्त धोका असणाऱ्या भागांमधील लस घेतलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा मास्क घालावा लागणार आहे. आरोग्य प्रशासनाने लसीकरण झालेल्या या नागरिकांना मास्क वापरण्याचे निर्देश दिले आहेत.
Centers for Disease Control and Prevention च्या संचालकांनी पत्रकार परिषदेत मास्क वापरण्यासंबंधी निर्देश दिले. डेटानुसार लस अत्यंत प्रभावी आहे, मात्र डेल्टाच्या काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका असल्याचं म्हटलं आहे.
संसर्गाचं प्रमाण जास्त तसेच धोकादायक ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींना घरांमध्येही मास्क वापरण्याची शिफारस सीडीसी करत असल्याचं म्हटलं आहे. डेल्टा व्हेरिंएंटमुळे धोका अधिक वाढला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी लसीकरणामध्ये आपण अजून चांगली कामगिरी करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. तसेच लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी नवे निर्णय घेतले जाणार असल्याचं म्हटलं आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये जास्त लोकांनी लस घेतलीच नसल्याचं समोर आलं आहे. तर अमेरिकेतील काही भागात संसर्गाची 80 टक्के नवी प्रकरणं ही डेल्टा व्हेरिएंटची आढळून आली आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अशातच कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने (Delta Variant) थैमान घातले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, चीन, डेन्मार्क, भारत, इंडोनेशिया, इस्राईल, पोर्तुगाल, रशिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, ब्रिटन या देशांमध्ये ‘डेल्टा’चा प्रभाव 75 टक्क्यांहून अधिक असल्याचं दिसलं आहे.
डेल्टामुळे कोरोनाच्या इतर प्रकारांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता असून येत्या काळात डेल्टाचाच प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. जगभरात अल्फा प्रकारचे विषाणू 180 देशांत, बीटा प्रकारचे विषाणू 130 देशांत, गॅमा प्रकारचे 78 देशांत, तर डेल्टा प्रकारचे 124 देशांत रुग्ण नोंदविले गेले आहेत.