CoronaVirus Live Updates : अरे बापरे! कोरोना होताच 'या' ठिकाणी कंगाल झाले लोक; संपत्ती विकून करताहेत उपचार कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 12:10 PM2022-03-16T12:10:44+5:302022-03-16T12:31:06+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाची लागण झालेले लोक वेगळ्याच संकटात सापडत आहेत.

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 45 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. अनेक देशांत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.

2019 पासून कोरोना महामारीने अक्षरशः जगभरात थैमान घातलं आहे. एकापाठोपाठ एक व्हेरिएंट जगभरात पसरत आहे. डेल्टा आणि ओमायक्रॉननंतर आता चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वाढला आहे. पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

भारतात सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र तज्ज्ञांना अशी भीती आहे की भारतातही लवकरच कोरोनाची नवी लाट येऊ शकते. याच दरम्यान भारतात अनेकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

भारताशिवाय जर आपण मलेशियाबद्दल बोलायला गेलो, तर येथे कोरोनाची लागण झालेले लोक वेगळ्याच संकटात सापडत आहेत. मलेशियातील लोकांना या गोष्टीची भीती कमी आहे की कोरोना त्यांचा जीव घेईल कारण तिथे वेगळंच संकट आहे.

मलेशियातील लोकांना या गोष्टीची सर्वात जास्त भीती आहे, की कोरोना झाल्यास उपचारासाठी पैसे कुठून आणणार? या देशात कोरोनावरील उपचार अतिशय महागडे असून गरीबांना हे न परवडणारं आहे.

मलेशियातील एका व्यक्तीने याबाबत ट्विट करून खुलासा केला आहे या व्यक्तीने सांगितलं की कशाप्रकारे उपचाराच्या नावाखाली लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे हडपले जात आहेत. ट्विटरवर Nurasyiqin नावाच्या महिलेनं याबाबत खुलासा केला.

महिलेने कोरोनाची लागण होणं चांगलंच महागात पडतं. तिने व्यवस्थित हिशोब केला नाही मात्र कोरोना झाल्यावर तिची संपूर्ण सेव्हिंग्स संपली. भरपूर औषधं, टेस्ट किट्स आणि सप्लीमेंट्समध्ये हे पैसे खर्च झाल्याचं म्हटलं आहे.

काही कुटुंबांकडे तर कोरोनाची लागण झाल्यावर जेवण करण्यासाठीही पैसे उरले नाहीत असं म्हटलं आहे. Nurasyiqin चं हे ट्विट बघता बघता व्हायरल झालं. यानंतर अनेकांनी याठिकाणी आपले अनुभवही शेअर केले.

मलेशियातील अनेकांनी हे अगदी खरं असल्याचं सांगितलं. एका व्यक्तीने लिहिलं की कोरोनाच्या उपचारासाठी त्याला आपली संपत्ती विकावी लागली. कोरोनाची लागण झाल्यावर त्याच्या उपचारासाठी पैसे खर्च करूनच सगळ्यांची अवस्था बिकट होत आहे.

कोरोना चाचणी करण्यासाठीही सुमारे 23 हजार रूपये मोजावे लागतात. मलेशियातून समोर आलेली ही माहिती समजताच सर्वजण हैराण झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोना व्हायरस संसर्गाची लाट संपत नाही तोपर्यंत नवीन म्युटेशन समोर येत आहे. याच दरम्यान आता एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या नव्या संशोधनातून हे समोर आलं आहे.

कोरोना व्हायरसचं नवीन म्यूटेशन विध्वंस आणू शकतो. हा नवीन प्रकार डेल्टा आणि ओमायक्रॉनपासून बनलेला आहे. डब्ल्यूएचओने म्हटलं आहे की हे नवीन कॉम्बिनेशन व्हायरसबद्दल आधीच भीती होती कारण ते दोन्ही खूप वेगाने पसरत आहेत.

फ्रान्समधील संस्था पॅस्चर इन्स्टीट्यूटने नवीन व्हायरसवर संशोधन केलं आहे. यामध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉन या व्हायरसबाबत ठोस पुरावे मिळाले आहेत. अभ्यासानुसार, फ्रान्समधील अनेक भागात नवीन कॉम्बिनेशन व्हायरस आढळून आला आहे. हा नवीन व्हायरस जानेवारी 2022 पासून पसरत आहे.

डेन्मार्क आणि नेदरलँडमध्येही समान जीनोम आणि प्रोफाइलचे व्हायरस आढळून आल्याचेही अभ्यासात म्हटले आहे. हे सर्व नवीन कॉम्बिनेशन व्हायरस एकाच म्युटेशनमधून निर्माण झाले आहेत का याबाबत अजूनही तपास आणि विश्लेषण करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

जेव्हा सुरुवातीला लोकांना डेल्टा आणि ओमायक्रॉन प्रकारांच्या एकत्रित प्रकाराची भीती वाटली आणि त्याला डेल्टाक्रोन म्हटलं गेलं, तेव्हा WHO ने सांगितले की डेल्टा आणि ओमाक्रॉन कॉम्बिनेशन असं काहीही नाही.