CoronaVirus Live Updates : कोरोनाचे रौद्ररुप! फ्रान्समध्ये तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा; रुग्णसंख्येने वाढवली चिंता, परिस्थिती गंभीर By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 03:44 PM 2021-04-01T15:44:16+5:30 2021-04-01T16:02:01+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. फ्रान्समध्ये तिसरी लाट आली आहे. फ्रान्समध्ये कोरोनाने रौद्ररुप धारण केलं असून पुन्हा एकदा तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 12 कोटींवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रगत देशही हतबल झाले आहेत. कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. फ्रान्समध्ये तिसरी लाट आली आहे. फ्रान्समध्ये कोरोनाने रौद्ररुप धारण केलं असून पुन्हा एकदा तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे
फ्रान्समध्ये कोरोना व्हायरसमुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. संपूर्ण देशात चार आठवड्यांचा लॉकडाऊन असल्याचं म्हटलं आहे.
देशव्यापी लॉकडाऊनचा आदेश देतानाच इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी फ्रान्समध्ये शाळा तीन आठवड्यांसाठी बंद असतील अशी माहिती दिली आहे. जर आपण आता कठोर पाऊल उचललं नाही तर नियंत्रण गमावू अशी भीती मॅक्रॉन यांनी देशवासियांना संबोधित करताना व्यक्त केली.
लॉकडाऊन दरम्यान फक्त जीवनावश्यक वस्तुंची दुकानं सुरू करण्याची परवानगी आहे. तसेच ऑफिसमध्ये जाण्याऐवजी वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. तसेच 10 किमीहून अधिक अंतरावर जाण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे.
फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी लॉकडाऊनमध्ये कोरोना लसीकरणाचा वेग अधिक वाढवला जाईल असं म्हटलं आहे. तसेच 18 वर्षांवरील सर्व लोकांना कोरोना लस देण्यात येणार असल्याचं देखील म्हटलं आहे.
फ्रान्समध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने तब्बल 46 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर आतापर्यंत 95502 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
काही दिवसांपूर्वी कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन पॅरिसमध्ये पुन्हा एकदा एक महिन्याच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता फ्रान्समध्ये तिसरा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
फ्रान्समध्ये गेल्या 24 तासांत हजारोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्र्यांनी पॅरिसमधील सध्याची परिस्थिती चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. जवळपास ICU मध्ये शेकडो रुग्णांवर उपचार सुरू असून अनेक ठिकाणी ICU पूर्ण भरले आहेत.
नोव्हेंबरच्या तुलेनेत ही संख्या खूपच जास्त आहे. नवीन निर्देशांनुसार, लोकांना घरातून काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. घराबाहेर पडण्यासाठी आणि व्यायामशाळेत जाण्यासाठी आवश्यक परवानगी घ्यावी लागणार आहे.
कोणत्याही नागरिकाला आपल्या घरापासून 10 किमीपेक्षा अधिक दूर जाता येणार नाही. पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांनी याआधी लागू झालेल्या लॉकडाऊनपेक्षा या लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल आहेत असं म्हटलं आहे.
लॉकडाऊनमध्ये शाळा आणि जीवनावश्यक वस्तुंचे दुकाने सुरू राहणार आहेत. लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी असली तरी सोशल डिस्टेसिंगचे पालन आणि मास्कचा वापर करावच लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शाळा, विद्यापीठ सुरूच राहणार असून अत्यावश्यक व्यवसाय सुरूच राहणार आहे. फ्रान्समधील गंभीर परिस्थिती पाहता लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक असलेले खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत.
जगभरातील अनेक देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अमेरिकेतील रुग्णांच्या संख्येत देखील सातत्याने वाढ होत आहे. तर काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात येत आहे. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.