CoronaVirus Live Updates : चिंताजनक! डेल्टा अन् ओमायक्रॉन एकत्र येऊन घडवू शकतात विनाश; WHO ने दिला धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 04:52 PM2022-03-14T16:52:00+5:302022-03-14T17:07:07+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरस संसर्गाची लाट संपत नाही तोपर्यंत नवीन म्युटेशन समोर येत आहे. याच दरम्यान आता एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 45 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनामुळे काही देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोरोना व्हायरस संसर्गाची लाट संपत नाही तोपर्यंत नवीन म्युटेशन समोर येत आहे. याच दरम्यान आता एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या नव्या संशोधनातून हे समोर आलं आहे.

कोरोना व्हायरसचं नवीन म्यूटेशन विध्वंस आणू शकतो. हा नवीन प्रकार डेल्टा आणि ओमायक्रॉनपासून बनलेला आहे. डब्ल्यूएचओने म्हटलं आहे की हे नवीन कॉम्बिनेशन व्हायरसबद्दल आधीच भीती होती कारण ते दोन्ही खूप वेगाने पसरत आहेत.

फ्रान्समधील संस्था पॅस्चर इन्स्टीट्यूटने नवीन व्हायरसवर संशोधन केलं आहे. यामध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉन या व्हायरसबाबत ठोस पुरावे मिळाले आहेत. अभ्यासानुसार, फ्रान्समधील अनेक भागात नवीन कॉम्बिनेशन व्हायरस आढळून आला आहे. हा नवीन व्हायरस जानेवारी 2022 पासून पसरत आहे.

डेन्मार्क आणि नेदरलँडमध्येही समान जीनोम आणि प्रोफाइलचे व्हायरस आढळून आल्याचेही अभ्यासात म्हटले आहे. हे सर्व नवीन कॉम्बिनेशन व्हायरस एकाच म्युटेशनमधून निर्माण झाले आहेत का याबाबत अजूनही तपास आणि विश्लेषण करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

WHO मध्ये कोरोना टेक्निकल टीमचे नेतृत्व करणाऱ्या मारिया वॅन कर्खोव यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की हे अपेक्षित होतं, विशेषत: हे दोन्ही प्रकार खूप वेगाने पसरत आहेत. WHO या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे आणि या संदर्भात अभ्यास सुरू आहे.

जेव्हा सुरुवातीला लोकांना डेल्टा आणि ओमायक्रॉन प्रकारांच्या एकत्रित प्रकाराची भीती वाटली आणि त्याला डेल्टाक्रोन म्हटलं गेलं, तेव्हा WHO ने सांगितले की डेल्टा आणि ओमाक्रॉन कॉम्बिनेशन असं काहीही नाही.

मारिया यांनी स्पष्ट केलं की एक व्यक्तीला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या प्रकारांचा संसर्ग होऊ शकतो. कोरोनामुळे काही ठिकाणी अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सध्या कोरोनाचा वेग मंदावताना पण असं असताना काही मात्र देशांनी टेन्शन वाढवलं आहे. तेथील परिस्थिती अत्यंत वाईट असून कोरोना रुग्णांच्या, मृतांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याची माहिती समोर आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या साप्ताहिक रिपोर्टनुसार, 28 फेब्रुवारी ते 6 मार्च 2022 दरम्यान कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत पाच टक्क्यांची तर मृतांच्या आकड्यात आठ टक्क्यांची घट पाहायला मिळत आहे.

रिपोर्टनुसार, पॅसिफिकच्या पश्चिम भागात कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. एका आठवड्यात नव्या रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. तब्बल 46 टक्क्यांची वाढ झाली आहे.

मंगोलिया, चीन, ऑस्ट्रेलिया, कम्बोडिया, फिज़ी, जपान, मलेशिया, लाओस, फिलिपीन्स, न्यूझीलँड, सोलोमन द्वीप, सिंगापूर, दक्षिण कोरिया, पलाऊ, व्हिएतनाम, पापुआ न्यू गिनीसारख्या देशांचा समावेश आहे.