CoronaVirus Live Updates : "जग कोरोनामुळे धोकादायक परिस्थितीत, तब्बल 40 लाख बळी"; WHO ने दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 12:01 PM2021-07-08T12:01:55+5:302021-07-08T12:48:15+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता वाढवली आहे.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 18 कोटींच्या वर गेली आहे. तर तब्बल 40 लाखांहून अधिक लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. अनेक देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून गंभीर परिस्थिती आहे. कोरोनाग्रस्तांची आणि मृतांची संख्या ही सातत्याने वाढत आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

जगभरातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही एक कोटींहून अधिक आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान चिंता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबतच गंभीर इशारा दिला आहे.

जगभरातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. काही देशांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषणा केली आहे. तर काही देशांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहेत. याच दरम्यान WHO ने जगभरात कोरोनाची परिस्थिती बिघडत चालली असल्याची माहिती दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रसस यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, जग कोरोनामुळे धोकादायक परिस्थितीत आहे. जगात कोरोनामुळे आतापर्यंत 40 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

काही देशांमध्ये जेथे कोरोना लसीकरण जलदगतीने केले गेले आहे, त्यांना असे वाटू लागले की रोगराई पूर्णपणे संपली आहे. तर कमी लसीकरण झालेल्या देशांमध्ये पुन्हा कोरोनाचे प्रकार वाढत आहेत असं टेड्रोस यांनी म्हटलं आहे.

अमेरिका, भारत आणि ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. या देशात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. जगात सर्वात जास्त रुग्ण हे या तीन देशांमध्ये आढळून आले आहेत.

अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल साडे तीन कोटींवर पोहोचली आहे. तर मृतांच्या संख्येने सहा लाखांचा टप्पा पार केला आहे. यानंतर भारतातील कोरोनारुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे.

कोरोना रुग्णांचा आकडा 3,07,09,557 वर पोहोचला आहे. भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 45,892 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 817 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 4,05,028 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

ब्राझीलमधील कोरोना रुग्णांची संख्या ही दीड कोटींहून अधिक असून सव्वा पाच लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर फ्रान्समध्ये 57 लाख, तुर्की आणि रशियामध्ये 56 लाख आणि यूकेमध्ये 49 लाख रुग्ण आढळले आहेत.

अर्जेंटिनामध्ये 45 लाख, कोलंबियामध्ये 41 लाख आणि इटलीमध्ये 42 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. अमेरिका, ब्राझील आणि भारत वगळता कोरोनामधील मृत्यूमध्ये मेक्सिकोतील कोरोनामधील मृतांचा आकडा 2 लाखांवर पोहोचला आहे.

पेरूमध्ये एक लाख 93 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. इंग्लंडमध्ये कोरोनामुळे एक लाख 28 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्येही मृतांचा आकडा सव्वा लाखापर्यंत पोहोचला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

भारतात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने जगभरातील देशांचं टेन्शन वाढवलं आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढू लागली आहे. आतापर्यंत तब्बल 100 देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळल्याची माहिती समोर आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोकादायक असलेला डेल्टा व्हेरिएंट हा सर्वप्रथम फेब्रुवारीमध्ये भारतात आढळून आला आहे. मात्र आता जवळपास 100 देशांमध्ये त्याचा प्रसार झाला आहे.

मूळ कोरोना व्हायरसपेक्षा हा व्हेरिएंट अडीचपटीने अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. भारत, अमेरिका, ब्रिटन, रशिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटमुळे बाधितांची संख्या वाढू लागली आहे.