शक्तीहीन कोरोना! "वाघाचा जंगली मांजर बनला"; मोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 11:50 AM 2020-06-22T11:50:09+5:30 2020-06-22T11:56:11+5:30
CoronaVirus कोरोनामुळे जगभरात 90 लाखांवर रुग्ण सापडले असून 4.78 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला इटलीमध्ये कोरोनाने हाहाकार माजविला होता. मात्र, नंतर इटलीने कोरोनावर नियंत्रण मिळविले होते. सध्या ब्राझीलमध्ये कोरोना उत्पात माजवत आहे. कोरोनाने अवघ्या जगाला नामोहरम केले आहे. मात्र, इटलीतून एक चांगली बातमी येत आहे. सुरवातीचा ताकदवर असलेला कोरोना दुबळा झाल्याचा दावा तेथील एका मोठ्या डॉक्टरने केला आहे.
कोरोनामुळे जगभरात 90 लाखांवर रुग्ण सापडले असून 4.78 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला इटलीमध्ये कोरोनाने हाहाकार माजविला होता. मात्र, नंतर इटलीने कोरोनावर नियंत्रण मिळविले होते. सध्या ब्राझीलमध्ये कोरोना उत्पात माजवत आहे.
इटलीच्या प़ॉलिक्लिनिक सॅन मार्टिनो हॉस्पिटलचे तज्ज्ञ प्रोफेसर मॅट्टीओ बस्सेटी यांनी सांगितले की, कोरोना आधीपेक्षा खूप कमजोर पडला असून आधी वाघासारखा वागणारा कोरोना व्हायरस आता जंगली मांजर झाला आहे.
ब्रिटिश टेलिग्राफनुसार बस्सेटीयांनी दावा केला आहे की, कोणत्याही लसीशिवाय कोरोना व्हायरस आपोआप नष्ट होऊ शकणार आहे. बस्सेटी यांच्या कोरोना व्हायरस कमजोर झाल्याच्या मतावर जगभरातील काहीच डॉक्टरांनी सहमती दर्शविली आहे.
बस्सेटी हे Policlinico San Martino हॉस्पिटलमध्ये साथरोग विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी सांगितले की, आधी ज्या स्थितीमध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यू होत होता, आता त्याच स्थितीतील रुग्ण बरे होत आहेत. इटलीमध्ये नवीन रुग्णांची संख्याही घटली आहे.
इटलीमध्ये सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 20970 एवढी आहे. तर एक टक्क्याहून कमी रुग्ण गंभीर आहेत. तर एकूण रुग्णांची संख्या 2.1 लाख असून 34 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
इटलीमध्ये मार्चच्या शेवटी दिवसाला 10 हजार रुग्ण सापडू लागले होते. मात्र, आता 200 ते 300 रुग्णच सापडत आहेत. बस्सेटी यांनी सांगितले की, कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागल्याचा अर्थ असा आहे की, कोरोना व्हायरस संपविण्यासाठी लसीची गरज लागणार नाही.
कोरोना व्हायरसचे संकट कमी होत आहे. मार्च आणि एप्रिलच्या सुरवातीला कोरोनाचा वेग प्रचंड होता. तेव्हा लोक श्वासही घेऊ शकत नव्हते. गेल्या चार आठवड्यांपासून हे चित्र बदलले आहे. लोकांमधील व्हायरल इन्फेक्शन कमी होऊ शकते.
इटलीमध्ये आता 80 ते 90 वर्षांचे रुग्ण बरे होऊ लागले आहेत. ते कोणत्याही व्हेंटिलेटरशिवाय श्वास घेत आहेत. लॉकडाऊन, मास्क आणि सोशल डिस्टंन्सिंगमुळे व्हायरसचे संक्रमण कमी होत आहे.
Rutherford Health चे मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रोफेसर कॅरोल सिकोरा यांनीदेखील कोरोना आपोआप नष्ट होऊ शकतो असे सांगितले होते.
एक्स्टर मेडिकल स्कूलचे प्राध्यापक भारत पंखानिय यांनी कोरोना नष्ट होईल हा विचारा आशावादी राहण्यासाठीच ठीक असल्याचे म्हटले होते.