CoronaVirus : malaria drug shows no benefit in another coronavirus study vrd
CoronaVirus : भारताच्या 'गेमचेंजर' औषधानं केलं निराश; जगभरात होता आशेचा किरण By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 01:13 PM2020-05-10T13:13:32+5:302020-05-10T13:21:33+5:30Join usJoin usNext कोरोनाच्या उपचारात वापर होत असलेल्या मलेरियाच्या औषधासंदर्भात एक नवीन अभ्यास समोर आला आहे. कोरोना विषाणूच्या रुग्णांना हे औषध कोणत्याही प्रकारचा लाभ देत असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असं अभ्यासामध्ये म्हटले आहे. हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधावर करण्यात आलेला हा अभ्यास न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या औषधाचे वर्णन गेम चेंजर म्हणून केले होते, तसेच बरेच देश भारतातून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आयात करीत आहेत. कोलंबियामधील विद्यापीठात सुमारे 1,400 उपचार घेणाऱ्या रुग्णांवर याचा अभ्यास करण्यात आला असल्याचे संशोधकांनी सांगितले. संशोधनात असे दिसून आले आहे की, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन कोरोना रुग्णांमध्ये मृत्यूची जोखीम कमी करत नाही किंवा तसेच श्वासोच्छवासाची समस्याही सोडवत नाही. हा अभ्यास कोणत्याही प्रयोगासाठी नव्हे तर केवळ निरीक्षणासाठी करण्यात आला आहे. काही डॉक्टरांनी असे लिहिले आहे की, हा अभ्यास अनेक महत्त्वपूर्ण सूचना देतो आणि त्यामधून कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांवर बरेच महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात. डॉक्टरांनी अभ्यासात लिहिले आहे की, 'हे निराशाजनक आहे की इतक्या दिवसानंतरही या साथीच्या रोगावर औषध तयार करण्यात आलेलं नाही. त्याचदरम्यान हा नवीन अभ्यास हे दर्शवितो की, हायड्रोक्सीक्लोरोक्विन एक रामबाण औषध नाही. या अभ्यासाच्या सुरुवातीस, हृदयाचा ठोका वाढणे आणि अचानक मृत्यू ओढावण्यासारखे गंभीर दुष्परिणाम सांगितले गेले होते. अमेरिकेच्या फूड अॅण्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशननेही कोरोना विषाणूच्या उपचारांसाठी हे औषध न वापरण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेमध्ये कोरोनाचं थैमान वाढत चाललं असून, तिथले वैज्ञानिक त्यावर लस विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus