CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोनाने थैमान घातलेलं असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 12:11 PM 2020-05-21T12:11:22+5:30 2020-05-21T12:26:32+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना काही सकारात्मक घडामोडीदेखील घडत आहेत. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका, इटली, स्पेन या देशांमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा हा सातत्याने वाढत आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत 329,735 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 50 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.
जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 5,090,118 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 2,024,286 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना काही सकारात्मक घडामोडीदेखील घडत आहेत. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.
देशात आणि जगात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनासंदर्भात दिलासादायक माहिती मिळत आहे.
जगात तब्बल 20 लाख लोकांनी कोरोनावर मात करून कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. 2,024,334 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
जगभरात आतापर्यंत 2,024,334 हून अधिक जणांनी कोरोनाला हरवलं असून त्यांना उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्याही एक लाखांहून हून अधिक झाली असून आतापर्यंत 3400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 1 लाख 12 हजार 359 वर पोहचली आहे. यामध्ये 63 हजार 624 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर 3 हजार 435 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. सोशल डिस्टंसिंग, मास्क, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. उपचारानंतर अनेकांनी कोरोनावर मात केली आहे.