CoronaVirus News : चिमुकल्यांना मास्क लावणं गरजेचं आहे की नाही?, WHO ने जारी केले नवे नियम By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 11:22 AM 2020-08-23T11:22:28+5:30 2020-08-23T11:38:03+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: जागतिक आरोग्य संघटनेने चिमुकल्यांच्या मास्कबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. WHO च्या नव्या सूचनांनुसार, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनाही प्रौढांसारखे मास्क घालणे महत्त्वाचे आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 30 लाखांहून अधिक झाली असून आतापर्यंत 55 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टंसिंगसह मास्क वापरण्याचा सल्ला जगभरातील तज्ज्ञ देत आहेत. अनेक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
काही देशांमध्ये मास्क वापरणं अनिवार्य असून न घातल्यास हजारो रुपयांचा दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
सोशल डिस्टन्सिंग शक्य नाही तिथे मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. असं असताना आरोग्य तज्ज्ञांनी मात्र पालकांना लहान मुलांना मास्क घालण्यासंबंधी सल्ला दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने चिमुकल्यांच्या मास्कबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. WHO च्या नव्या सूचनांनुसार, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनाही प्रौढांसारखे मास्क घालणे महत्त्वाचे आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीने मास्क घालण्यासाठी जगभरात जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनाही लागू आहेत असं म्हटलं आहे.
WHO ने दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना मोठ्यांप्रमाणे कोरोना संसर्गाचा धोका जास्त असतो. त्यामुळे मास्क महत्त्वाचा आहे.
जेथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही अशा ठिकाणी किंवा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असलेल्या ठिकाणी मुलांनीही मास्क घालावेअसं देखील म्हटलं आहे.
WHOच्या मते 12 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले प्रौढांप्रमाणे कोरोना पसरवू शकतात. तर 5 वर्षांखालील मुलांना मास्क घालणे अनिवार्य नाही असं देखील सांगितलं आहे.
पाच वर्षांखालील मुलांना कोरोनाचा धोका कमी आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांना मास्क घालणे बंधनकारक नाही असं देखील WHOने स्पष्ट केले आहे.
6 ते 11 वर्ष वयोगटातील मुलांनी मास्कचा वापर करावा. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असलेल्या ठिकाणी मुलांनीही मास्क घालणे गरजेचा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काही दिवसांपूर्वी दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी मास्क धोकादायक ठरू शकतं असं जपानच्या आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं होतं. जपान पीडियाट्रिक असोसिएनशनने पालकांना सावध केलं होतं.
दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालू नका, त्यांना समस्या उद्भवू शकतात अशी सूचना जपान पीडियाट्रिक असोसिएनशनने पालकांसाठी जारी केली होती.
2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालणं बंद करा. लहान मुलांचा एअर पॅसेज लहान असतो. मास्क घातल्याने त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो असं त्यांनी म्हटलं होतं.
मास्कमुळे मुलांच्या हृदयावर ताण येऊ शकतोस, तसेच हिट स्ट्रोकचा धोकाही वाढू शकतो, अशी सूचना या पालकांना देण्यात आल्या आहेत.
कोरोना व्हायरसची गंभीर प्रकरणं ही चिमुकल्यांमध्ये अगदी कमी आहेत. बहुतेक लहान मुलांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडूनच कोरोनाची लागण झालेली आहे.