CoronaVirus News : रशियानंतर 'या' देशाने तयार केली कोरोना लस; आपत्कालीन स्थितीत 2 लसींना मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 08:51 AM2020-08-24T08:51:28+5:302020-08-24T09:04:48+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून धडकी भरवणारा ग्राफ सातत्याने समोर येत आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनामुळे अनेक देशांतील परिस्थिती गंभीर आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर आठ लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे.

कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. याच दरम्यान रशियाचे राष्ट्रपती ब्लादमीर पुतीन यांनी कोरोना लस तयार झाल्याची घोषणा केली आहे.

रशियाने या लसीला ‘स्पुटनिक व्ही’ असे नाव दिले आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडूनही कोरोनावरील या लसीला मान्यता देण्यात आली आहे.

रशियाकडून SputnikV वेबसाईट देखील लाँच करण्यात आली आहे. रशियानंतर आता आणखी एका देशाला आपत्कालीन स्थितीत 2 लसींना मंजुरी देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

चीनमध्ये काही निवडक कंपन्यांनी मिळून तयार केलेल्या दोन लसींना आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्याची मंजुरी मिळाली असल्याची माहिती चीनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

संक्रमणाचा धोका ज्या व्यक्तींना सर्वात जास्त आहे अशा रुग्णांवर याचा वापर करता येणार आहे. मेडिकल कन्सेन्ट फॉर्म, साईड इफेक्ट्स मॉनिटर करण्याचा प्लॅन तयार करण्यात आला आहे.

चीनच्या कोरोना व्हायरस लसीकरण विकास टास्क फोर्सचे प्रमुख झेंग झॉन्गवी यांनी सरकारी सीसीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय नियम पाळून ही लस दिली जाणार आहे.

लस दिल्यानंतर रुग्णांची निरीक्षणं नोंदवण्यात येणार असून त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेण्यात येईल. या लशीचे होणारे दुष्परिणाम आणि नुकसान याचा विचार करून एक विशेष पॅकेज तयार करण्यात आलं आहे.

चीनमधील दोन्ही लसींना फक्त आपत्कालीन स्थितीत वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी येत्या काही दिवसांत खूप लोकांना ही लस देण्यावर अधिक भर असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

फूड मार्केट, ट्रान्सपोर्ट सिस्टम आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांपर्यंत कोरोनाची लस पोहोचवण्याचं काम केलं जाईल असंही सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वच देश सज्ज झाले असून अनेक ठिकाणी चाचण्यांना यश येत आहेत. तसेच खबरदारीचे सर्व उपाय हे केले जात आहेत.

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 23,583,616 वर पोहोचली आहे. तर 812,513 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तब्बल 16,080,573 लोकांनी कोरोनावर मात करून कोरोनाविरुद्धचं युद्ध जिंकले आहे.

Read in English