CoronaVirus News: चीननं 'या' देशात मजूरांनाच टोचली कोरोना लस, वाद पेटला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 04:24 PM2020-08-21T16:24:10+5:302020-08-21T16:41:04+5:30

पापुआ न्यू गिनी येथे, आपल्या व्हॅक्सीनेशन ट्रायलमध्ये कोरोनाविरोधात कर्मचाऱ्यांची इम्यूनिटी वाढल्याचा दावा चीनच्या एका खाण कंपनीने (मायनिंग कंपनी) केला आहे. यासंदर्भात 'दि ऑस्ट्रेलियन' नावाच्या एका वृत्तपत्रातही वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या वृत्तानुसार, पापुआ न्यू गिनीचे आरोग्यमंत्रालय मायनिंग कंपनीच्या (रामू निको मॅनेजमेंट) दाव्याचा तपास करत असल्याचे आरोग्य मंत्री जेल्टा वॉन्ग यांनी म्हटले आहे. मात्र, यासंदर्भात आता मोठा वाद निर्माण होत असल्याचे दिसत आहे. (सांकेतिक छायाचित्र)

'नॅशनल पॅन्डेमिक रिस्पॉन्स कंट्रोलर' डेविड मॅनिंग यांनी गुरुवारीच पापुआ न्यू गिनीमध्ये (पीएनजी) कोविड-19 व्हॅक्सीनच्या ट्रायलवर बंदी घातली होती. नंतर, नॅशनल हेल्थ डिपार्टमेंटने येथे कुठल्याही प्रकारच्या व्हॅक्सीन ट्रायलला मंजूरी दिली नसल्याचेही समोर आले. (सांकेतिक छायाचित्र)

मॅनिंग शुक्रवारी म्हणाले होते, 'पीएनजीमध्ये आयात होणाऱ्या कुठल्याही व्हॅक्सीनला नॅशनल हेल्थ डिपार्टमेंटची मंजुरी घेणे अनिवार्य आहे. ट्रायलच्या सर्व आवश्यक टप्प्यांवरून, प्रोटोकॉल्स आणि प्रक्रियांतून व्हॅक्सीन जाणे आवश्यक आहे. तसेच WHO नेही तिला प्री क्वालीफाइड केलेली असायला हवी. (सांकेतिक छायाचित्र)

पापुआ न्यू गिनीच्या मदांग शहरात असलेल्या या कंपनीशी अद्याप संपर्क साधण्यात आलेला नाही. कंपनीच्या एका व्हॅक्सीनेशन स्टेटमेंटनुसार, येथे 10 ऑगस्टला चीनच्या 48 कर्मचाऱ्यांवर SARS-COV-2 व्हॅक्सीन टेस्ट करण्यात आली. यावर पीएनजीच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे, की व्हॅक्सीन देण्यात आलेल्या लोकांवर हिचे अनेक चांगले-वाईट परिणाम झालेले असू शकतात. (छायाचित्र - फेसबुक)

या प्रकारानंतर, मॅनिंग यांनी चीनचे राजदूत क्ज्यू बिंग यांना पत्र लिहून या प्रकरणावर चीन सरकारचे स्पष्टीकरण मागितले आहे. (सांकेतिक छायाचित्र)

ऑस्ट्रेलिया, पापुआ न्यू गिनीचा शेजारी आणि परराष्ट्र सहकार्याचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. दि ऑस्ट्रेलियनच्या वृत्तानुसार, चीनने राज्याच्या मालकीच्या उद्योगांतील कर्मचाऱ्यांचा वापर करून या भागांत कोरोना व्हॅक्सीनचे परीक्षण सुरू केले आहे. (सांकेतिक छायाचित्र)

ऑस्ट्रेलियन सरकारने या संपूर्ण प्रकरणावर अद्याप काहीही वक्तव्य केलेले नाही. पापुआ न्यू गिनी हा 90 लाख लोकसंख्या असलेला एक अत्यंत गरीब देश आहे. येथील जास्तीत जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. (सांकेतिक छायाचित्र)

या देशात आतापर्यंत एकूण 361 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यांपैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. (सांकेतिक छायाचित्र)

येथे गेल्या एक मिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. देशाची राजधानी पोर्ट मोर्सबी येथे महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कर्फ्यू लागू करण्यात येत आहे. (सांकेतिक छायाचित्र)

संपूर्ण जगात आतापर्यंत तब्बल 2 कोटी 28 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यांपैकी तब्बल 7 लाख 97 हजारहून अधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. (सांकेतिक छायाचित्र)