CoronaVirus News : लढ्याला यश! जगातली सर्वात जलद, स्वस्त टेस्ट किट तयार, फक्त 1 मिनिटांत कोरोनाचं निदान होणार? By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 11:57 AM 2020-05-29T11:57:34+5:30 2020-05-29T12:27:38+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगातली ही सर्वात जलद आणि स्वस्त टेस्ट किट असून यामध्ये फक्त एका मिनिटांत कोरोनाचं निदान होते. त्याचे निकाल 90 टक्क्यांपर्यंत अचूक असल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे. कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. अनेक देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच देश कोरोनाच्या संकटाशी दोन हात करत आहेत.
वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाने प्रगत देशांची चिंता वाढली आहे. कोरोना टेस्ट किट अनेक चर्चा रंगल्या आहेत.
चीनने स्वतःच कोरोना टेस्ट किट तयार करून इतर देशांना महागड्या दराने विकल्या. यातील बर्याच किटमध्ये दोष असल्याचे आढळले होते. भारतासह अनेक देशांनी या टेस्ट किट चीनला परत केल्या.
कधी अँटीबॉडी टेस्ट किट, तर कधी आरटी-पीसीआर टेस्ट किटबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. याचदरम्यान आता इस्त्राईलने केवळ 3,800 रुपयांचं कोरोना टेस्ट किट बनवण्याचा दावा केला आहे.
जगातली ही सर्वात जलद आणि स्वस्त टेस्ट किट असून यामध्ये फक्त एका मिनिटांत कोरोनाचं निदान होते. त्याचे निकाल 90 टक्क्यांपर्यंत अचूक असल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे.
इस्त्राईलच्या बेन-गुरियन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हे किट तयार केले आहे. इलेक्ट्रो-ऑप्टिकल कोरोना टेस्ट किट नाक, घसा आणि फूंक मारून सॅम्पल घेतले जातात.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, किटमध्ये एक खास प्रकारचे सेन्सर असून ते कोरोनाचे निदान करते. जेव्हा रुग्ण चाचणी किटमध्ये फुंकतो तेव्हा ड्रॉपलेट्स सेन्सरपर्यंत पोहोचतात.
ड्रॉपलेट्स सेन्सरपर्यंत पोहोचल्यानंतर हा सेन्सर क्लाऊड सिस्टमशी कनेक्ट केलेला आहे. सेन्सर सिस्टमचे विश्लेषण केल्यास रुग्ण पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे कळतं.
टेस्ट किटची किंमत ही इतर पीसीआर टेस्टपेक्षा कमी आहे. तसेच यासाठी लॅबची देशील आवश्यकता नसल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. ( सर्व फोटो Credit- Ben-Gurion University)
विमानतळ, सीमा, स्टेडियम यासारख्या ठिकाणी ही चाचणी किट खूप उपयुक्त ठरेल. या ठिकाणी, त्वरित निकाल देणारी कोरोना टेस्ट किट सर्वात यशस्वी होईल.
इलेक्ट्रिक-ऑप्टिकल अभियांत्रिकीमधील बीजीयूच्या स्कूल ऑफ इलेक्ट्रिक आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग व विद्याशाखातील संशोधन प्रमुख गॅबी सरुसी यांन ही कल्पना मांडली.
किट लोकांना लवकरात लवकर मिळावी यासाठी अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) कडून मान्यता मिळवण्यासाठी त्यांची टीम तयारी करत आहे.
सारूसी यांच्या मते क्लीनिकल ट्रायलच्या सुरुवातीपासूनच याचे चांगले परिणाम मिळत आहेत. कोरोनाच्या वेगवेगळ्या स्टेजबाबतही यातून माहिती मिळवता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
क्लीनिकल ट्रायलसाठी 120 इस्त्रायली लोकांची निवड करण्यात आली आहे. चाचणीमध्ये याचा उत्तम परिणाम दिसून येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.