CoronaVirus Marathi News corona vaccine development update oxford university and moderna take lead
Corona Vaccine Update: या भारतीय कंपनीमध्ये तयार होतेय कोरोनाची 'सर्वात अॅडव्हान्स्ड' व्हॅक्सीन By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 01:02 PM2020-06-08T13:02:09+5:302020-06-08T13:15:48+5:30Join usJoin usNext सध्या संपूर्ण जगातील संशोधक कोरोनावरील व्हॅक्सीन त्यार करण्याच्या कामात लागलेले आहेत. 120 पैकी किमान 10 व्हॅक्सीनचे क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. यात Modernaची mRNA-1273 आणि ऑक्सफर्डची AZD1222 यांचाही समावेश आहे. AZD1222 ही फेज 3मध्ये जाणारी जगातील पहिलीच कोरोना व्हॅक्सीन आहे. हिच्या प्रोडक्शनची जबाबदारी ब्रिटिश फार्मा कंपनी AstraZeneca वर आहे. AstraZenecaने भारतातील Serum Institute of India (SII) सोबत करार केला आहे. SIIने या वर्षाच्या अखेर पर्यंत 400 मिलियन डोस तयार करण्याची तयारी दर्शवली आहे. याचाच अर्थ जगातील 'सर्वात अॅडव्हान्स्ड' कोरोना व्हॅक्सीनचे प्रॉडक्शन भारतातही होत आहे. याशिवाय यूके, नॉर्वे, स्वित्झर्लंडच्या कंपन्यांमध्येही ही व्हॅक्सीन तयार केली जात आहे. ऑक्सफर्डच्या व्हॅक्सीनचे मास प्रॉडक्शन सुरू - ऑक्सफर्ड व्हॅक्सीन ग्रुप आणि जेनर इंस्टीट्यूटने जानेवारी महिन्यात व्हॅक्सीनवर संशोधन करण्यास प्रारंभ केला होता. सुरुवातीला 160 स्वस्थ लोकांवर याची टेस्ट झाली. आता ही व्हॅक्सीन फेज 3 मध्ये आहे. ही व्हॅक्सीन सामान्य सर्दी-खोकल्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या व्हायरसपासून तयार करण्यात आली आहे. ही शरीरात इम्यूनिटी रिस्पॉन्स तयार करेल आणि इन्फेक्शनचा प्रसार रोखेल. या व्हॅक्सीनचे मास प्रॉडक्शन सुरू झाले आहे. Modernaची व्हॅक्सीनही रेसमध्ये - अमेरिकन कंपनी Modernaची mRNA व्हॅक्सीनदेखील इम्यून सिस्टमला कोरोनाचे स्पाइक प्रोटीनला ओळखण्याचे ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करते. ही व्हॅक्सीन सध्या दुसऱ्या स्टेजवर आहे. कोरोना व्हायरसच्या जेनेटिक सिक्वेंसची माहिती मिळाल्यानंतर 66 दिवसांच्या आतच या व्हॅक्सीनच्या ह्यूमन ट्रायलला सुरुवात झाली होती. फेज 2मध्ये बऱ्याच व्हॅक्सीन - कोरोना व्हॅक्सीन तयार करण्यासाठी जगातील दिग्गज युनिव्हर्सिटीजसह अनेक फार्मा कंपन्या कंबर कसून प्रयत्न करत आहेत. BioNTech, Novavax, Sinovac, Pfizer शिवाय अनेक व्हॅक्सीन ट्रायलच्या पहिल्या अथवा दुसऱ्या टप्प्यावर आहेत. व्हॅक्सीन येणार केव्हा? हा प्रश्न कायम - व्हॅक्सीन तयार करण्यासाठी जवळपास 10 वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, कोरोनाने निर्माण केलेली परिस्थिती पाहता, लवकरात लवकर यावरील व्हॅक्सीन तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक तज्ज्ञांना आशा आहे, की वर्षाच्या अखेरपर्यंत व्हॅक्सीन तयार होईल. मात्र, यानंतरही तीचे प्रोडक्शन आणि डिस्ट्रिब्यूशनचा प्रश्न राहीलच. आपल्याला या व्हायरससोबतच जगावे लागेल, असे म्हणणारेही अनेक लोक आहेत. मात्र अनेक तज्ज्ञांनी विश्वासही व्यक्त केला आहे, की वर्षाच्या अखेरपर्यंत अथवा पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत व्हॅक्सीन डेव्हलप होईल.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याइंग्लंडअमेरिकास्वित्झर्लंडcorona virusEnglandAmericaSwitzerland