CoronaVirus Marathi News coronavirus first case found in rohingya camp in bangladesh sna
CoronaVirus News : रोहिंग्या मुस्लिमांच्या सर्वात मोठ्या 'रिफ्यूजी कॅम्प'मध्ये घुसला कोरोना, येथे राहतात तब्बल 10 लाख लोक By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 05:53 PM2020-05-15T17:53:18+5:302020-05-15T18:10:16+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार घातला आहे. यातच आता जगातील सर्वात मोठ्या रिफ्यूजी कॅम्पमध्येही कोरोना व्हायरसची घंटा वाजली आहे. बांगलादेशात रोहिंग्या शरणार्थ्यांच्या कॅम्पमध्ये कोरोना घुसल्याचे समोर आले आहे. बांगलादेश शरणार्थी सहायता आयोगाचे अध्यक्ष महबूब आलम तालुकदार यांनी गुरुवारी सांगितले, कॉक्स बाजार येथील रिफ्यूजी कॅम्पमध्ये कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. येथे शरणार्थी आणि एक इतर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव असल्याचे आढळून येताच त्यांना आयसोलेशन केंद्रात पाठवण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र शरणार्थी एजंन्सीचे प्रवक्ता लुईस डोनोवन यांनी द असोसिएटेड प्रेसला दिलेल्या माहितीत म्हटले आहे, की त्या दोघांच्याही संपर्कात येणाऱ्या लोकांचा शोध घेतला जात आहे. तसेच सापडलेल्या या दोन्ही कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. दुसरा संक्रमित व्यक्ती रोहिंग्या शरणार्थी कॅम्पमध्ये जिल्ह्यात रहराहत नाही. तो कॉक्स बाजार तो. या कॅम्पमध्ये एकूण 10 लाख रोहिंग्या मुसलमान राहतात. यामुळे येथे कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आल्याने चिंता वाढली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की हा एक गंभीर इशारा आहे. कारण कॉक्स बाजार शरणार्थी शिबिरांमध्ये तब्बल 10 लाखहून अधिक रोहिंग्या मुसलमान राहतात. त्यांना मुलभूत सुविधादेखील फार कमी प्रमाणात मिळतात. कॉक्स बाजार हा अत्यंत दाटीवाटीचा आणि गर्दी असलेला भाग आहे. या भागात म्हणावी तशी स्वच्छता आणि स्वच्च पाणीही नाही. येथे कोरोना व्हायरसपासून बचावासाठी असणाऱ्या नियमांचे पालन होणेही अवघड होऊ शकते. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, येथील कॅम्पच्या तंबुंमध्ये जवळपास 40,000 लोक प्रति वर्ग किलोमीटर लोकसंख्येप्रमाणे राहतात. हे प्रमाण बांगलादेशच्या सरासरी प्रमाणापेक्षा 40 पट अधिक आहे. येथे तयार करण्यात आलेली प्रत्येक झोपडी मोठ्या मुश्किलीने 10 वर्ग मीटर एवढी आहे. यात 12-12 लोक एकत्र राहतात. म्यानमारमधून 2017मध्ये बहुतांश रोहिंग्या मुसलमान पळून आले आणि आता बांगलादेशमध्ये रिफ्यूजी कॅम्पमध्ये राहत आहेत. येथे रोहिंग्या शरणार्थ्यांची संख्या जवळपास दहा लाख एवढी आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्यारोहिंग्यामुस्लीमइस्लामबांगलादेशम्यानमारcorona virusRohingyaMuslimIslamBangladeshMyanmar