CoronaVirus Marathi News coronavirus this mutation spread 10 times more infectious
CoronaVirus News: कोरोनाचं 'हे' रूप इतर Covid-19च्या रुपापेक्षा 10 पट घातक, देण्यात आलं असं नाव By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 02:45 PM2020-06-14T14:45:28+5:302020-06-14T14:55:24+5:30Join usJoin usNext कोरोनाच्या एका म्यूटेशन स्ट्रेनसंदर्भात माहिती मिळाली आहे. हा प्रकार इतर कोरोना व्हायरसच्या तुलनेत 10 पट घातक ठरू शकतो. अमेरिकेतील स्क्रिप्स रिसर्च इंस्टिट्यूटने केलेल्या एका अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, स्क्रिप्स रिसर्च इंस्टिट्यूटने केलेल्या अभ्यासातून असे संकेत मिळाले आहेत, की अमेरिका, इंग्लंड आणि इटलीमध्ये कोरोना व्हायरसचे एक असे म्यूटेशन दिसून आले आहे, जे वुहानमध्ये आढळून आलेल्या कोरोना व्हायरसपेक्षा 10 पट संक्रमक आहेत. वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की कोरोनाचे हे म्यूटेशन स्ट्रेन शरीरात रिसेप्टर्सवर हल्ला करते. कोरोना व्हायरसच्या (SARS-CoV-2) व्हर्जनला D614G नाव देण्यात आले आहे. कोरोना व्हायरसच्या या स्ट्रेनमध्ये इतर व्हायरसच्या तुलनेत 4 ते 5 पट अधिक 'स्पाइक्स प्रोटीन' असतात. या अभ्यासानुसार, कोरोना व्हायरसचे D614G व्हर्जन केवळ 10 पट अधिक संक्रमितच नाही, तर अधिक स्थीरदेखील आहे. कोरोना व्हायरस काही शहरांमध्ये आणि देशांमध्ये अधिक हाहाकार घालत आहे. तर काही ठिकाणी त्याचा प्रभाव फार कमी दिसतो. यामागचे नेमके कारण काय? हे शोधण्यासाठी अनेक देशांचे वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. इटली, इंग्लंड आणि न्यू यॉर्क शहरात D614G स्ट्रेन अधिक असल्याचे यापूर्वीही काही संशोधनातून समोर आले होते. या शहरांत कोरोना व्हायरसने अधिक बळी घेतले आहेत. जगभरात आतापर्यंत 77.6 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याइंग्लंडइटलीअमेरिकाcorona virusEnglandItalyAmerica