CoronaVirus Marathi News moderna Inc coronavirus vaccine to begin final stage of testing in july
CoronaVirus News: खुशखबर! मॉडर्नाची कोरोना व्हॅक्सीन अखेरच्या टप्प्यात, 'या' महिन्यात मिळू शकते 'गुड न्यूज' By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 05:02 PM2020-06-12T17:02:05+5:302020-06-12T17:26:49+5:30Join usJoin usNext जगभरात अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरस व्हॅक्सीनचे परिक्षण सुरू आहे. अशातच अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडर्नाने आपल्या व्हॅक्सीनचे अखेरचे परीक्षण जुलै महिन्यात करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी परीक्षणाच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचली असून आता 30 हजार जणांवर कोरोना व्हायरस व्हॅक्सीनचे परीक्षण करणार आहे. यातील काही लोकांना रिअल शॉट दिला जाणार आहे, तर काहींना डमी शॉट दिला जाणार आहे. यामुळे, दोन्हीपैकी कोणत्या समुहाचे लोक अधिक संक्रमित आहेत, हे समजणे शक्य होईल. केम्ब्रिज, मसाचुसेट्स येथील बायोटेकचे म्हणणे आहे, या अभ्यासाचा मुख्य हेतू लक्षण असणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या रोखणे आहे. यानंतर दुसरा हेतू महामारीला आळा घालणे असा असेल. Moderna Incने म्हटले आहे, की त्यांनी अखेरच्या टप्प्यावरील अभ्यासासाठी व्हॅक्सीनचे 100 मायक्रोग्रॅमचे डोस तयारही केले आहेत. याशिवाय कंपनी दर वर्षी 50 कोटी डोस डिलिव्हर करण्याच्या तयारीत आहे. कंपनी हे डोस स्विस ड्रगमेकर Lonzaच्या साथीने तयार करेल. चीनची बायोटेक कंपनी सिनोवेक ब्राझीलच्या लोकांवर व्हॅक्सीनची फायनल टेस्ट करणार आहे. अेमेरिकेनंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका ब्राझीललाच बसला आहे. सिनोवेक ब्राझीलच्या 9000 लोकांवर परीक्षण करण्यासाठी मुबलक व्हॅक्सीन पाठवेल. हे परीक्षण पुढील महिन्यातच सुरू कले जाईल, असे ब्राझील सरकारने म्हटले आहे. साओ पावलोचे राज्यपाल जोआओ डोरिया म्हणाले, 'हे परीक्षण यशस्वी ठरले, तर आम्ही व्हॅक्सीनने ब्राझीलच्या लाखो लोकांचे रक्षण करण्यात यशस्वी होऊ.' जगभरात जवळपास एक डझन संभाव्य कोरोना व्हॅक्सीन परीक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहेत. अमेरिकेच्या National Institutes of Healthने अनेक व्हॅक्सीनचे अंतिम परीक्षण आणि मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असलेल्या अभ्यासात सहकार्याची आशा व्यक्त केली आहे. यात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या व्हॅक्सीनचाही समावेश आहे. व्हॅक्सीन रिसर्च सेन्टरचे सदस्य डॉक्टर जॉन मॅस्कोला National Academy of Medicineच्या एका बैठकीत म्हणाले, सर्वकाही व्यवस्थीत पार पडले, तर या वर्षाच्या अखेरपर्यंत कोणती व्हॅक्सीन कोरोना व्हायरससाठी कार्यकरेल हे सांगणे शक्य होईल.'टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्याभारतमहाराष्ट्रcorona virusCoronaVirus Positive NewsIndiaMaharashtra